India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : भारत-श्रीलंका दिवस रात्र कसोटीचा दुसरा दिवस यजमानांच्या नावावर राहिला. भारताने याही कसोटीत विजयाच्या दिशेनं पाऊल टाकले आहे. पहिल्या डावातील १४३ धावांच्या आघाडीत भारताने ३०३ धावांची भर घालून श्रीलंकेसमोर विजयासाठी ४४७ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेने एक फलंदाज गमावून २८ धावा केल्या आहेत. विजयासाठी त्यांना अजूनही ४१९ धावा हव्या आहेत, तर भारताला ९ विकेट्स घ्यायच्या आहेत. दिवसाचा खेळ संपल्यानंतर बंगळुरूच्या चिन्नास्वमी स्टेडियमवर एकच गोंधळ उडाला. तीन प्रेक्षक सुरक्षा रक्षकांना चकवून थेट मैदानावर घुसले अन् त्यानंतर...
श्रीलंकेच्या ६ फलंदाजांनी पहिल्याच दिवशी नांगी टाकल्या होत्या आणि त्यानंतर उर्वरित ४ विकेट्स मिळवण्यात भारताला फार कष्ट घ्यावे लागले नाही. जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) भारतात प्रथमच डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्यानंतर रिषभ पंत ( Rishabh Pant ) व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांच्या फटकेबाजीने भारताला मोठे लक्ष्य उभे करून दिले. रिषभ पंतने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम नावावर केला. हा विक्रम मागील ४० वर्षे कपिल देव यांच्या नावावर होता. रिषभ ३१ चेंडूंत ५० धावा करून बाद झाला.
रवींद्र जडेजा व फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यर यांनी १०१ धावांत ६३ धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात ९२ धावा करणाऱ्या श्रेयसने अर्धशतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली. दिवस रात्र कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारा श्रेयस हा पहिला भारतीय ठरला. श्रेयस ८७ चेंडूंत ९ चौकारांसह ६७ धावांवर बाद झाला. भारताने दुसरा डाव ९ बाद ३०३ धावांवर घोषित केला. श्रीलंकेसमोर विजयासाठी ४४७ धावांचे लक्ष्य आहे. जसप्रीतने पहिल्याच षटकात श्रीलंकेला धक्का देताना लाहिरू थिरिमनेला बाद केले.
नेमके काय घडले?
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर तीन प्रेक्षक स्टेडियमवर घुसले. त्यापैकी दोघांना विराटसोबत सेल्फी काढण्यात यश आले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सुरक्षारक्षकही गोंधळले. पण, विराटने या फॅन्सवर कोणतीही कारवाई करू नका असे त्यांना सांगितले.
Web Title: IND vs SL, 2nd Test Stumps on Day 2 : Three fans entered the playing arena and two of them managed to get a selfie with Virat Kohli, Kohli asking security not to do anything against fans, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.