ठळक मुद्देप्रवीण जयविक्रमा ( 3/59) आणि अकिला धनंजया ( 3/44) यांनी भारताला मोठे धक्के दिले.
IND vs SL 3rd ODI Int Live Score : तिसऱ्या वन डे सामन्यात केलेले पाच बदल टीम इंडियाच्या पथ्यावर पडले नाही. पदार्पणवीर संजू सॅमसनने दमदार खेळ केला, परंतु अन्य फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी कमाल दाखवली. प्रवीण जयविक्रमा ( 3/59) आणि अकिला धनंजया ( 3/44) यांनी भारताला मोठे धक्के दिले. पृथ्वी शॉ सुसाट खेळला, संजू व सूर्यकुमार यादवनंही चांगले योगदान दिले. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 47-47 षटकांचा करण्यात आला आहे.
ज्याच्यामुळे संघातून व्हावे लागले बाहेर, त्या संजू सॅमसनसोबत इशान किशन वागला असा काही, Photo Viral
भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानं तिसऱ्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ व संजू सॅमसन यांनी दमदार खेळी करताना अनुक्रमे 49 व 46 धावा केल्या. या दोघांचेही अर्धशतक हुकले. शिखर धवनने खणखणीत चौकार खेचून टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला, परंतु 13 धावांवर त्याला माघारी जावे लागले. त्यानंतर पदार्पणवीर संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 74 धावा जोडल्या. IND VS SL Live 2nd ODI, IND vs SL 3rd ODI Live
श्रीलंकेचा जल्लोष, सूर्यकुमार यादवची पेव्हेलियनच्या दिशेनं कूच अन् अम्पायरनं केला इशारा...
या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. पृथ्वी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत होता, तर पदार्पणवीर संजूची फटक्यांची नजाकत पाहून चाहते आनंदी झाले. पृथ्वी 49 चेंडूंत 8 चौकारांसह 49 धावांवर पायचीत झाला. संजूनेही सुरेख फटकेबाजी केली अन् प्रविण जयविक्रमा गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरला उभ्या असलेल्या असलेल्या खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू काढण्याचा प्रयत्न फसला. फर्नांडोनं हवेत झेपावत सुरेख झेल टिपून संजूला 46 धावांवर ( 5 चौकार व 1 षटकार) माघारी जावं लागलं. Ind vs SL 2021, Ind vs SL 2021 2nd ODI, Ind vs SL 2021 Live Score
पावसाच्या व्यत्ययामुळे तासभराचा खेळ वाया गेला. त्यामुळे सामना 47-47 षटकांचा झाला. पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर भारताला धक्का बसला. मनीष पांडे पुन्हा संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरला अन् जयविक्रमानं त्याला 11 धावांवर यष्टिरक्षकाकरवी झेलबाद करून बाद केले. हार्दिक पांड्याला आज फलंदाजीसाठी भरपूर वेळ मिळाला होता, परंतु तोही 19 धावांवर जयविक्रमाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. अकिला धनंजयानं 31व्या षटकात सूर्यकुमार यादवला 40 धावावर बाद केले. 2009नंतर प्रथमच भारताचे आघाडीचे सहा फलंदाज 10-49 या वैयक्तिक धावांमध्ये बाद झाले. पुढच्याच षटकात धनंजयानं पदार्पणवीर के गौथमला बाद केले. नवदीप सैनी व राहुल चहर यांनी भारताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. या दोघांनी नवव्या विकेटसाठी 29 धावा जोडल्या. भारताचा संपूर्ण संघ 43 षटकांत 225 धावांत तंबूत परतला. vs SL 2021 Live Updates, IND Vs SL 2021, IND VS SL Live ODI Match Today
Web Title: IND vs SL 3rd ODI Int Live Score : India are all out for 225 runs, Prithvi Shaw, Sanju Samson and Surya Kumar yadav were the top performers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.