IND Vs SL 3rd ODI Live : टीम इंडियानं तिसऱ्या सामन्यात पाच जणांना दिली पदार्पणाची संधी; 1980नंतर घेतला गेला धाडसी निर्णय!

IND vs SL 3rd ODI Int Live Score : तीन वन डे सामन्याच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियानं तिसऱ्या सामन्यात पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 02:37 PM2021-07-23T14:37:04+5:302021-07-23T15:35:19+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL 3rd ODI Int Live Score : Sanju Samson, Nitish Rana, Chetan Sakariya, K Gowtham and Rahul Chahar making their ODI debut today, India opt to bat first | IND Vs SL 3rd ODI Live : टीम इंडियानं तिसऱ्या सामन्यात पाच जणांना दिली पदार्पणाची संधी; 1980नंतर घेतला गेला धाडसी निर्णय!

IND Vs SL 3rd ODI Live : टीम इंडियानं तिसऱ्या सामन्यात पाच जणांना दिली पदार्पणाची संधी; 1980नंतर घेतला गेला धाडसी निर्णय!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SL 3rd ODI Int Live Score : तीन वन डे सामन्याच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियानं तिसऱ्या सामन्यात पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं पहिला सामना सहज जिंकला, त्यानंतर दुसऱ्या वन डे सामन्यात दीपक चहरनं थरारक सामन्यात श्रीलंकेच्या तोंडचा घास पळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात टीम इंडियात बदल पाहायला मिळणे अपेक्षित होते आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला. 


भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 1980 इंडियानं एकाच वन डे सामन्यात पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. आजच्या सामन्यात नवदीप सैनी हाही खेळणार असून भारतीय संघ सहा बदलांसह श्रीलंकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. संजू सॅमसन, नितीश राणा, चेतन सकारीया, के गोवथम आणि राहुल चहर यांनी आज पदार्पण केले. ( India are handing five debuts: Nitish Rana, Rahul Chahar, Chetan Sakariya, K Gowtham and Sanju Samson.) 

भारतीय संघ - शिखर धवन, पृथ्वी शॉ, संजू सॅमसन, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, नितीश राणा, कृष्णप्पा गौथम, राहुल चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया

कोणाला मिळाली विश्रांती - भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, युजवेंद्र चहल, कृणाल पांड्या, इशान किशन, कुलदीप यादव

2015च्या झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियानं ट्वेंटी-20 सामन्यात पाच जणांना पदार्पणाची कॅप दिली होती. स्टुअर्ट बिन्नी, मनीष पांडे, केदार जाधव, अक्षर पटेल आणि संदीप शर्मा यांनी तेव्हा पदार्पण केल होते. याच दौऱ्यावर संजू सॅसमननं दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून पदार्पण केले होते आणि आज पाच वर्षांनी त्यानं वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यापूर्वी 1080-81 साली दीलिप दोशी, किर्ती आझाद, रॉजर बिन्नी, संदीप पाटील आणि तिरुमलाई श्रीनिवासन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच वन डे सामन्यातून पदार्पण केले होते.  

Web Title: IND vs SL 3rd ODI Int Live Score : Sanju Samson, Nitish Rana, Chetan Sakariya, K Gowtham and Rahul Chahar making their ODI debut today, India opt to bat first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.