IND Vs SL 3rd ODI Live : पावसानं अडवली टीम इंडियाची वाट; 'गब्बर'सेना पुन्हा मैदानावर न उतरल्यास श्रीलंकेला मिळू शकते इतक्या धावांचे लक्ष्य

IND vs SL 3rd ODI Int Live Score : सूर्यकुमार यादव आणि मनिष पांडे खेळपट्टीवर असताना पावसाची बॅटिंग सुरू झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तेव्हा भारतानं 23 षटकांत 3 बाद 147 धावा केल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 05:39 PM2021-07-23T17:39:54+5:302021-07-23T18:00:56+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL 3rd ODI Int Live Score : Team India 147/3 in 23 overs, If India does not bat again, then Sri Lanka's target will be 189 in 23 overs | IND Vs SL 3rd ODI Live : पावसानं अडवली टीम इंडियाची वाट; 'गब्बर'सेना पुन्हा मैदानावर न उतरल्यास श्रीलंकेला मिळू शकते इतक्या धावांचे लक्ष्य

IND Vs SL 3rd ODI Live : पावसानं अडवली टीम इंडियाची वाट; 'गब्बर'सेना पुन्हा मैदानावर न उतरल्यास श्रीलंकेला मिळू शकते इतक्या धावांचे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SL 3rd ODI Int Live Score : मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या टीम इंडियानं तिसऱ्या वन डे सामन्यात पाच पदार्पणवीरांसह सहा बदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला. भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानं तिसऱ्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ व संजू सॅमसन यांनी दमदार खेळी करताना अनुक्रमे 49 व 46 धावा केल्या. या दोघांचेही अर्धशतक हुकले. सूर्यकुमार यादव आणि मनिष पांडे खेळपट्टीवर असताना पावसाची बॅटिंग सुरू झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तेव्हा भारतानं 23 षटकांत 3 बाद 147 धावा केल्या होत्या. आता जर भारत पुन्हा फलंदाजीला न उतरल्यास श्रीलंकेसमोर तगडे आव्हान ठेवले जाऊ शकते... 

श्रीलंकेचा जल्लोष, सूर्यकुमार यादवची पेव्हेलियनच्या दिशेनं कूच अन् अम्पायरनं केला इशारा...  


भारतीय संघानं तिसऱ्या वन डेत संजू सॅमसन, नितीश राणा, चेतन सकारीया, के गोवथम आणि राहुल चहर यांना पदार्पणाची संधी दिली. शिखर धवनने खणखणीत चौकार खेचून टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला, परंतु 13 धावांवर त्याला माघारी जावे लागले. त्यानंतर पदार्पणवीर संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 74 धावा जोडल्या. या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. पृथ्वी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत होता, तर पदार्पणवीर संजूची फटक्यांची नजाकत पाहून चाहते आनंदी झाले. पृथ्वी 49 चेंडूंत 8 चौकारांसह 49 धावांवर पायचीत झाला. संजूनेही सुरेख फटकेबाजी केली अन् प्रविण जयविक्रमा गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरला उभ्या असलेल्या असलेल्या खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू काढण्याचा प्रयत्न फसला. फर्नांडोनं हवेत झेपावत सुरेख झेल टिपून संजूला 46 धावांवर ( 5 चौकार व 1 षटकार) माघारी जावं लागलं. Ind vs SL 2021, Ind vs SL 2021 2nd ODI

23 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जयाविक्रमानं सूर्यासाठी पायचीतची अपील केली अन् मैदानावरील अम्पायरने त्याला बाद दिले. सुर्यकुमारनं DRS घेतला अन् त्यातची चेंडू यष्टींवर आदळत असल्याचे दिसत होते. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी जल्लोष केला. सूर्यकुमारही पेव्हेलियनच्या दिशेनं चालू लागला, परंतु मैदानावरील अम्पायरनं त्याला इशारा करून थांबवलं अन् तिसऱ्या पंचांनी त्यांना निर्णय बदलण्यास सांगितले. चेंडू इम्पॅक्ट आऊटसाईट असल्यानं तिसऱ्या अम्पायरनं सूर्याला नाबाद दिले. दरम्यान पावसामुळे खेळ थांबला असून भारताच्या 23 षटकांत 3 बाद 147 धावा झाल्या आहेत. टीम इंडियाला पुन्हा फलंदाजीची संधी न मिळाल्यास श्रीलंकेसमोर 23 षटकांत 189 धावांचे लक्ष्य ठेवले जाऊ शकते. ( Team India 147/3 in 23 overs, If India does not bat again, then Sri Lanka's target will be 189 in 23 overs)  Ind vs SL 2021 Live Score, Ind vs SL 2021 Live Updates

Web Title: IND vs SL 3rd ODI Int Live Score : Team India 147/3 in 23 overs, If India does not bat again, then Sri Lanka's target will be 189 in 23 overs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.