India vs Sri Lanka, 3rd ODI Live : विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद सिराजने भन्नाट गोलंदाजी करताना श्रीलंकेला हतबल केले. भारताच्या ३९० धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ ७३ धावांवर माघारी पाठवला. भारताने ३१७ धावांनी हा सामना जिंकून इतिहास रचला.
रोहित शर्माने मालिका विजयाची ट्रॉफी हातात दिली अन् इमोशनल झाला खेळाडू; पाहा Video
रोहित शर्मा ( ४२) व शुभमन यांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. गिलने ९७ चेंडूत ११६ धावांच्या खेळी साकारताना १४ चौकार आणि २ षटकार खेचले. विराटने आज आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७४वे शतक पूर्ण केले आणि वन डे तील हे त्याचे ४६ वे शतक ठरले. विराट आणि शुभमन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. किंग कोहलीने ११० चेंडूंत १३ चौकार व ८ षटकारांसह १६६ धावा चोपल्या. श्रेयस अय्यर (38) धावांची साजेशी खेळी केली. भारताने ५ बाद ३९० धावांचा डोंगर उभा केला.
विशाल लक्ष्याचा ओझ्याखाली श्रीलंकेचा संघ दबला गेला. मोहम्मद सिराजने सुरूवातीपासूनच धक्कातंत्र सुरू ठेवले. फलकावर ५० धावा चढेपर्यंत श्रीलंकेचे ७ फलंदाज माघारी परतले होते आणि त्यात सिराजच्या चार विकेट्स होत्या. याव्यतिक्त सिराजने रन आऊटही केला. सिराजने १०-१-३२-४ अशी कामगिरी केली, मोहम्मद शमी व कुलदीप यादव यांनीही उल्लेखनीय कामगिरी करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ ७३ धावांवर माघारी पाठवला. भारताने ३१७ धावांनी हा सामना जिंकून इतिहास रचला.
सामना सुरू असताना विराटचा चाहता मैदानावर धावत आला अन् त्याने भारतीय फलंदाजाचे पाय पकडले. यानंतर सूर्याकुमार यादव त्या चाहत्यासाठी फोटोग्राफर बनलेला पाहायला मिळाला.