IND vs SL, 3rd ODI Live : रोहित शर्माने मालिका विजयाची ट्रॉफी हातात दिली अन् इमोशनल झाला खेळाडू; पाहा Video 

India vs Sri Lanka, 3rd ODI Live : विराट कोहलीने तीन दिवसांत सलग दुसरे आंतरराष्ट्रीय शतक झळकावताना टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 08:30 PM2023-01-15T20:30:40+5:302023-01-15T20:31:06+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 3rd ODI Live : Captain Rohit Sharma hands the trophy to Mohammad Siraj, Watch Video  | IND vs SL, 3rd ODI Live : रोहित शर्माने मालिका विजयाची ट्रॉफी हातात दिली अन् इमोशनल झाला खेळाडू; पाहा Video 

IND vs SL, 3rd ODI Live : रोहित शर्माने मालिका विजयाची ट्रॉफी हातात दिली अन् इमोशनल झाला खेळाडू; पाहा Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 3rd ODI Live : विराट कोहलीने तीन दिवसांत सलग दुसरे आंतरराष्ट्रीय शतक झळकावताना टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले होते. तीन वर्ष विराटच्या बॅटीतून धावा आटल्या होत्या, परंतु आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना किंग कोहली परतल्याने चाहते आनंदात आहेत. शुभमन गिल यानेही मिळालेल्या संधीचं सोनं करताना आज शतक झळकावले. त्यानंतर मोहम्मद सिराजने गोलंदाजीत कमाल दाखवली अन् भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

भारतीय संघाने वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचला; जगात असा विजय कोणाला कधीच मिळवता आला नाही

रोहित शर्मा ( ४२) व शुभमन यांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. रोहित माघारी परतल्यानंतर शुभमन व विराट यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई सुरू केली. गिलने ९७ चेंडूत ११६ धावांच्या खेळी साकारताना १४  चौकार आणि २ षटकार खेचले. विराटने आज आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७४वे शतक पूर्ण केले आणि वन डे तील हे त्याचे ४६ वे शतक ठरले. यासह त्याने घरच्या मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. विराट आणि शुभमन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. किंग कोहलीने ११० चेंडूंत १३ चौकार व ८ षटकारांसह १६६ धावा चोपल्या. श्रेयस अय्यर (38) धावांची साजेशी खेळी केली. भारताने ५ बाद ३९० धावांचा डोंगर उभा केला.  


विशाल लक्ष्याचा ओझ्याखाली श्रीलंकेचा संघ दबला गेला. मोहम्मद सिराजने सुरूवातीपासूनच धक्कातंत्र सुरू ठेवले. फलकावर ५० धावा चढेपर्यंत श्रीलंकेचे ७ फलंदाज माघारी परतले होते आणि त्यात सिराजच्या चार विकेट्स होत्या. याव्यतिक्त सिराजने रन आऊटही केला. सिराजने १०-१-३२-४ अशी कामगिरी केली, मोहम्मद शमी व कुलदीप यादव यांनीही उल्लेखनीय कामगिरी करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ ७३ धावांवर माघारी पाठवला. भारताने ३१७ धावांनी हा सामना जिंकून इतिहास रचला. वन डे क्रिकेटमध्ये ३००+ धावांच्या फरकाने विजय मिळवणारा भारत हा जगातील पहिलाच संघ ठरला. २००० मध्ये श्रीलंकेच्या ५ बाद २९९ धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण संघ ५४ धावांत तंबूत परतला होता. आज टीम इंडियाने व्याजासहित वसूली केली. 
वन डे क्रिकेटमधील सर्वात मोठे विजय
भारत - ३१७ वि. श्रीलंका, २०२३
न्यूझीलंड - २९० वि. आयर्लंड, २००८
ऑस्ट्रेलिया - २७५ वि. अफगाणिस्तान, २०१५
दक्षिण आफ्रिका - २७२ वि. झिम्बाब्वे, २०१०
दक्षिण आफ्रिका - २५८ वि. श्रीलंका, २०१२  

Web Title: IND vs SL, 3rd ODI Live : Captain Rohit Sharma hands the trophy to Mohammad Siraj, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.