India vs Sri Lanka, 3rd ODI Live : विराट कोहलीने तीन दिवसांत सलग दुसरे आंतरराष्ट्रीय शतक झळकावताना टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले होते. तीन वर्ष विराटच्या बॅटीतून धावा आटल्या होत्या, परंतु आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना किंग कोहली परतल्याने चाहते आनंदात आहेत. शुभमन गिल यानेही मिळालेल्या संधीचं सोनं करताना आज शतक झळकावले. त्यानंतर मोहम्मद सिराजने गोलंदाजीत कमाल दाखवली अन् भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
रोहित शर्मा ( ४२) व शुभमन यांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. रोहित माघारी परतल्यानंतर शुभमन व विराट यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई सुरू केली. गिलने ९७ चेंडूत ११६ धावांच्या खेळी साकारताना १४ चौकार आणि २ षटकार खेचले. विराटने आज आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७४वे शतक पूर्ण केले आणि वन डे तील हे त्याचे ४६ वे शतक ठरले. यासह त्याने घरच्या मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. विराट आणि शुभमन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. किंग कोहलीने ११० चेंडूंत १३ चौकार व ८ षटकारांसह १६६ धावा चोपल्या. श्रेयस अय्यर (38) धावांची साजेशी खेळी केली. भारताने ५ बाद ३९० धावांचा डोंगर उभा केला.
वन डे क्रिकेटमधील सर्वात मोठे विजयभारत - ३१७ वि. श्रीलंका, २०२३न्यूझीलंड - २९० वि. आयर्लंड, २००८ऑस्ट्रेलिया - २७५ वि. अफगाणिस्तान, २०१५दक्षिण आफ्रिका - २७२ वि. झिम्बाब्वे, २०१०दक्षिण आफ्रिका - २५८ वि. श्रीलंका, २०१२