Join us  

IND vs SL 3rd ODI Live : हार्दिक पांड्यासह संघातील दोघांना विश्रांती; टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात केले दोन मोठे बदल

India vs Sri Lanka 3rd ODI Live : भारत - श्रीलंका यांच्यातला तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 1:06 PM

Open in App

India vs Sri Lanka 3rd ODI Live : भारत - श्रीलंका यांच्यातला तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. भारतीय संघाने मालिका आधीच खिशात घातली असल्यामुळे या सामन्यात संघात बदल पाहायला मिळणे अपेक्षित होते.  सूर्यकुमार यादवला आज संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

भारताने दोन्ही वन डे सामन्यात सहज विजय मिळवला. पहिल्या वन डेत विराट कोहलीचे शतक महत्त्वाचे ठरले, तर दुसऱ्या वन डेत कुलदीप यादव, मोहम्मद सिराज यांचा अचूक मारा आणि लोकेश राहुलच्या संयमी खेळीने भारताला विजय मिळवून दिले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देऊन आज इशान किशन व सूर्यकुमार यादव याला संधी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मोहम्मद शमीलाही विश्रांती मिळेल अशी शक्यता होती. हार्दिक पांड्या व उम्रान मलिक यांना आजच्या सामन्यात विश्रांती दिली गेली असून त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर व सूर्यकुमार यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले आहे. 

भारतीय संघ - रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली. श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद समी, मोहम्मद सिराज 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाहार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादव
Open in App