Join us  

IND vs SL: भारताने आधीच मालिका जिंकली, तिसऱ्या T20साठी टीम इंडियात होणार ४ मोठे बदल?

Team India predicted playing XI, IND vs SL 3rd T20I: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियाची ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-०ने आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 2:15 PM

Open in App

Team India predicted playing XI, IND vs SL 3rd T20I: भारतीय संघाने २७ जुलैपासून सुरु झालेल्या श्रीलंका दौऱ्यावरील पहिला टप्पा जिंकला. ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. तिसरा टी२० सामना आज संध्याकाळी ७ वाजता खेळला जाणार आहे. मालिका आधीच जिंकली असल्याने आजच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल केलेले दिसू शकतात.

गेल्या सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिल याला विश्रांती देण्यात आली होती. मानेच्या दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. त्याच्याजागी संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले होते. या सामन्यातही संजू सॅमसन खेळेल पण त्याला मधल्या फळीत संधी दिली जाईल. शुबमन गिलचे संघात पुनरागमन होईल आणि रिषभ पंतच्या जागी संजू सॅमसनला फलंदाजी मिळेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव खेळतील.

मधल्या फळीत संजू सॅमसन, रियान पराग, शिवम दुबे आणि रिंकू सिंग या चौघांना स्थान दिले जाऊ शकते. रियान परागने उत्तम गोलंदाजी केली आहे. पण तो आणि रिंकू सिंग दोघांनाही फलंदाजीत म्हणावी तशी कमाल करता आलेली नाही. त्यामुळे या दोघांना आणखी एक संधी मिळणे जवळपास निश्चित आहे. तसेच हार्दिक पांड्यालाही विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी शिवम दुबेला संधी दिली जाऊ शकते.

हार्दिक प्रमाणेच अक्षर पटेललाही विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळू शकते. अर्शदीप सिंग यालाही विश्रांती दिली जाईल आणि खलील अहमदला संघात संधी मिळू शकेल. त्याशिवाय मोहम्मद सिराज आणि रवी बिश्नोई हे दोघे संघात असतील. 

तिसऱ्या टी२० साठी संभावित संघ- शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, रियान पराग, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, खलील अहमद

विश्रांती दिली जाऊ शकणारे खेळाडू- रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाभारतीय क्रिकेट संघश्रीलंकाहार्दिक पांड्याअक्षर पटेलसंजू सॅमसनरिषभ पंत