IND vs SL, 3rd T20I Live Update : Ouch!, Venkatesh Iyer ने सुरेख कॅच टिपला, वेदनेनं कळवळला; पण, रोहित शर्मासह सहकाऱ्यांमध्ये हशा पिकला, Video

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटलेला पाहायला मिळाला. पण, कर्णधार दासून शनाका पुन्हा एकदा भारी खेळला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 09:11 PM2022-02-27T21:11:57+5:302022-02-27T21:13:13+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 3rd T20I Live Update : Dinesh Chandimal cuts fiercely against Harshal Patel but only finds Venkatesh Iyer at backward point, Watch Video | IND vs SL, 3rd T20I Live Update : Ouch!, Venkatesh Iyer ने सुरेख कॅच टिपला, वेदनेनं कळवळला; पण, रोहित शर्मासह सहकाऱ्यांमध्ये हशा पिकला, Video

IND vs SL, 3rd T20I Live Update : Ouch!, Venkatesh Iyer ने सुरेख कॅच टिपला, वेदनेनं कळवळला; पण, रोहित शर्मासह सहकाऱ्यांमध्ये हशा पिकला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटलेला पाहायला मिळाला. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या आवेश खान व मोहम्मद सिराज यांनी सुरुवातीलाच श्रीलंकेला धक्के दिले. त्यांचे ४ फलंदाज २९ धावांवर माघारी परतले असताना कर्णधार दासून शनाका ( Dasun Shanaka) पुन्हा एकदा टीम इंडियासमोर नांगर रोवून उभा राहिला. या सामन्यात वेंकटेश अय्यरने ( Venkatesh Iyer) बॅकवर्ड पॉईंटला सुरेख झेल टिपला, परंतु त्यासाठी त्याला वेदनेला कवटाळावे लागले. पण, इतरांना हसू नाही आवरले...

मोहम्मद सिराजने पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सलामीवीर दानुष्का गुणतिलकाचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आवेशने दुसऱ्या षटकात पथूम निसांकाला ( १) माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिले. मागील सामन्यात निसांकाने भारतीय गोलंदाजांना झोडले होते. पाठोपाठ आवेशने श्रीलंकेला तिसरा धक्का देताना चरिथ असालंकाची ( ४) विकेट घेतली. श्रीलंकेची अवस्था ३ बाद ११ अशी केली. ९व्या षटकात रवी बिश्नोई गोलंदाजीला आला आणि त्याने जनिथ लियानागेला बाद करून श्रीलंकेचा चौथा झटका दिला. त्याची व दिनेश चंडिमलची १४ धावांची भागीदारी संपुष्टात आली.  
दिनेश चांडिमल व शनाका यांनी पाचव्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी केली, परंतु हर्षल पटेलने ही जोडी तोडली. चांडिमल २५ धावांवर बाद झाला. वेंकटेश अय्यरने त्याचा सुरेख झेल टिपला. 

पाहा व्हिडीओ.. 

पण, शनाका पुन्हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला. त्याने सहाव्या विकेटसाठी चामिका करुणारत्नेसह अर्धशतकीय भागीदारी करताना संघाला शतकी पल्ला पार करून दिला. शनाकाने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आवेश खानने टाकलेल्या १९व्या षटकात शनाकाने १९ धावा चोपून काढल्या. शनाकाने ३८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७४ धावांची खेळी केली आणि श्रीलंकाने ५ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या पाच षटकांत त्यांनी एकही विकेट न गमावता ६८ धावा केल्या. 

Web Title: IND vs SL, 3rd T20I Live Update : Dinesh Chandimal cuts fiercely against Harshal Patel but only finds Venkatesh Iyer at backward point, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.