Shreyas Iyer, IND vs SL, 3rd T20I Live Update : भारताच्या विजयाचे 'श्रेय'स अय्यरला; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रचला विश्वविक्रम

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची मालिका कायम राखली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 10:24 PM2022-02-27T22:24:47+5:302022-02-27T22:25:23+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 3rd T20I Live Update : India equals with Afghanistan and Romania for most consecutive wins in T20I history - 12 wins, India beat SL by 6 wickets, Shreyas Iyer (73*) | Shreyas Iyer, IND vs SL, 3rd T20I Live Update : भारताच्या विजयाचे 'श्रेय'स अय्यरला; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रचला विश्वविक्रम

Shreyas Iyer, IND vs SL, 3rd T20I Live Update : भारताच्या विजयाचे 'श्रेय'स अय्यरला; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रचला विश्वविक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची मालिका कायम राखली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघात झालेली खांदेपालट यशस्वी ठरताना दिसतेय. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांना ट्वेंटी-२० मालिकेत भारताने सहज लोळवले. रोहितच्या नेतृत्वाखालील हे मालिकेतील सलग तिसरे निर्भेळ यश आहे. श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) हा आजही भारताच्या विजयाचा स्टार ठरला. त्याने सलग तिसरे अर्धशतक झळकावताना भारताचा ऐतिहासिक विजय पक्का केला. भारताचा हा सलग १२ वा ट्वेंटी-२० विजय आहे. 

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटलेला पाहायला मिळाला. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या आवेश खान व मोहम्मद सिराज यांनी सुरुवातीलाच श्रीलंकेला धक्के दिले. त्यांचे ४ फलंदाज २९ धावांवर माघारी परतले असताना कर्णधार दासून शनाका ( Dasun Shanaka) पुन्हा एकदा टीम इंडियासमोर नांगर रोवून उभा राहिला.  त्याने सहाव्या विकेटसाठी चामिका करुणारत्नेसह अर्धशतकीय भागीदारी करताना संघाला शतकी पल्ला पार करून दिला. आवेश खानने टाकलेल्या १९व्या षटकात शनाकाने १९ धावा चोपून काढल्या. शनाकाने ३८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७४ धावांची खेळी केली आणि श्रीलंकाने ५ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या पाच षटकांत त्यांनी एकही विकेट न गमावता ६८ धावा केल्या. 

पुन्हा एकदा दुष्मंथा चमिराने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ वेळा चमिराने रोहितची विकेट घेतली. कर्णधार ५ धावांवर माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन व श्रेयस अय्यर यांनी दमदार खेळ केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या, परंतु सॅमसनला ( १८) मोठी खेळी साकारता आली नाही. दीपक हुडाला आज पुढे पाठवण्यात आले आणि त्यानेही काही सुरेख फटके मारले, परंतु लाहिरू कुमाराने भन्नाट यॉर्करवर त्याचा त्रिफळा उडवला. हुडाने २१ धावा केल्या. श्रेयसने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या मालिकेतील हे त्याचे सलग तिसरे अर्धशतक ठरले. वेंकटेश अय्यरलाही ( ५) आज संधीचं सोनं करता आले नाही.


श्रेयस आणि रवींद्र जडेजा ही मागच्या सामन्यातील स्टार जोडी पुन्हा एकदा श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर उभी राहिली. या दोघांनी अगदी सहजतेनं भारताला विजय मिळवून दिला. भारताने ही मालिका ३-० अशी जिंकून इतिहास रचला. ट्वेंटी-२०त सलग १२ सामने जिंकण्याच्या अफगाणिस्तान व रोमानिया यांच्या विश्वविक्रमाशी टीम इंडियाने आज बरोबरी केली. पण, एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध ट्वेंटी-२०त सर्वाधिक १७ विजय मिळवून भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान ( १६ वि. झिम्बाब्वे) यांचा विक्रम मोडला. श्रेयस व जडेजा यांनी भारताला ६ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. श्रेयस ४५ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ७३ धावांवर, तर जडेजा २२ धावांवर नाबाद राहिले. 

रोहितचा नकोसा विक्रम, श्रेयस अय्यरचा भारी पराक्रम

  • रोहितच्या नावावर नकोसा विक्रमही नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४५ वेळा एकेरी धावसंख्येवर माघारी परणारा तो फलंदाज ठरला. त्याने आयर्लंडच्या केव्हिन ओब्रायनचा ( ४४) नकोसा विक्रम नावावर केला.  
  • एका ट्वेंटी-२c० मालिकेत सलग तीन ५०+ धावा करणारा तो विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय ठरला. विराटने २०१२ मध्ये ( वि. श्रीलंका, न्यूझीलंड व अफगाणिस्ता), २०१४ मध्ये ( वि. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड) आणि २०१६ मध्ये ( वि. ऑस्ट्रेलिया) सलग तीन सामन्यांत ५०+ धावांचा पराक्रम केला होता.  
     

Web Title: IND vs SL, 3rd T20I Live Update : India equals with Afghanistan and Romania for most consecutive wins in T20I history - 12 wins, India beat SL by 6 wickets, Shreyas Iyer (73*)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.