Join us  

Ind vs SL: श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकण्याचा भारताचा निर्धार

मनीष पांडे, संजू सॅमसन यांना संधी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 9:49 PM

Open in App
ठळक मुद्देआज पुण्यात निर्णायक लढत

पुणे : पाहुण्या श्रीलंकेविरुद्ध तिसरी व अंतिम टी२० लढत जिंकून तीन सामन्यांची मालिका २-० अशा फरकाने जिंकण्याचा निर्धार टीम इंडियाने केला आहे. शुक्रवारी यजमान मालिका विजयासाठी, तर श्रीलंका बरोबरी साधण्याच्या निर्धाराने गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भिडतील.

गुवाहाटीतील पहिला सामना पावसात वाहून गेल्यानंतर इंदूरमध्ये बाजी मारून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पुण्यात होणारी ही लढत जिंकून मालिका खिशात घालण्यास ‘विराट सेना’ उत्सुक आहे. इंदूरमधील दोन्ही संघांचा खेळ बघता या सामन्यात भारतालाच जास्त संधी आहे. भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत बलाढ्य म्हणून गणला जातो. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ मात्र बºयापैकी अननुभवी आहे. असे असले तरी, टी२० क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याने श्रीलंकेलाही ही लढत जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडविण्याची संधी असेल.या मैदानावर पूर्वी २०१६ साली भारत-श्रीलंका एकमेकांविरुद्ध भिडले होते. या टी२० लढतीत भारताचा पराभव झाला होता. त्या पराभवाची परतफेड करण्याची नामी संधी भारताकडे चालून आली आहे. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या टी२० लढती विचारात घेता भारताची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. २०१२मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर ५ गडी राखून विजय मिळविला, तर दुसºया लढती लंकेने भारताना ५ गडी राखून सरशी साधली होती. या मैदानावर होणारी यजमान भारताची ही तिसरी टी२० लढत असेल.

सामन्यापूर्वी कर्णधधार विराट कोहलीने आपल्या संघाची प्रशंसा करीत खेळाडूंच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. सलामीला शिखर धवन काय कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या बॅटमधून वाहणारा धावांचा ओघ बºयापैकी आटला आहे. इंदूरमध्ये धवनने २९ चेंडूंत ३२, तर लोकेश राहुलने ३२ चेंडूंत ४५ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियात होणाºया टी२० विश्वचषकात सालामीला रोहित शर्माचा साथीदार म्हणून राहुल आणि शिखर यांच्यात स्पर्धा आहे. सध्या तरी या शर्यतीत राहुल आघाडीवर आहे.

श्रीलंकेचा अष्टपैलू इसुरु उदाना दुखापतीमुळे शुक्रवारी खेळू शकणार नाही. यामुळे पाहुण्या संघाला धक्का बसला आहे. सरावादरम्यान त्याला दुखापत झाली. माजी कर्णधार अँजेला मॅथ्यूजने सुमारे दीड वर्षांनंतर श्रीलंका संघात पुनरागमन केले आहे. इंदूरमध्ये त्याला   खेळविण्यात न आल्याने श्रीलंका क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. शुक्रवारी त्याचे खेळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

मनीष पांडे, संजू सॅमसन यांना संधी मिळणार?इंदूरमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ ‘विनिंग कॉम्बिनेशन’ बाजूला ठेवून मनीष पांडे आणि संजू सॅमसन यांना किंवा यांच्यापैकी एकाला संधी देणार का, याबाबत उत्सुकता आहे.या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. अलिकेडच्या काळात या दोघांनाही टी२० सामना खेळायला मिळालेला नाही. त्यादृष्टीने या दोघांना संधी मिळू शकते. इंदूर येथे शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी यांनी चांगला मारा केला. शार्दुलने ३. तर नवदीपने २ बळी घेत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे पांडे वा सॅमसन यांना कितपत संधी मिळेल, याबाबत ठामपणे सांगणे अवघड आहे. मागील ३ मालिकांपैकी पांडेला केवळ एका सामन्यात संधी मिळाली तर सॅमसन अजूनही पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंका