Join us  

ind vs sl final : ऐतिहासिक! सिराजने १६ चेंडूत घेतले ५ विकेट; फक्त १२ धावांत श्रीलंकेचा 'किल्ला' उद्ध्वस्त

ind vs sl live updates in marathi : आज आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 4:23 PM

Open in App

ind vs sl live match । कोलंबो : आज आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने इतिहास रचत केवळ १६ चेंडूत ५ बळी घेतले. पहिल्या षटकांत जसप्रीत बुमराहने एक बळी घेतल्यानंतर सिराजने यजमानांना मोठे धक्के दिले. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून एकाच षटकात चार बळी घेणारा मोहम्मद सिराज पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने पथुम निसंका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा आणि कर्णधार दासुन शनाका या पाच फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज. 

आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ - 

दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसंका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलालागे, दुशन हेमांथा, प्रमोद मधुशन, मथिक्ष्णा पथिराना.

टॅग्स :मोहम्मद सिराजभारत विरुद्ध श्रीलंकाएशिया कप 2023जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघ