IND vs SL Live Streaming : टीम इंडिया २०२३ या नव्या वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून करणार आहेत. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर भारतीय खेळाडूंना छोटा ब्रेक मिळाला होता, मात्र आता ३ जानेवारीपासून खेळाडूंच्या क्रिकेट वेळापत्रकाला श्रीलंका दौऱ्यापासून सुरू होणार आहे. नवीन वर्षात मोठ्या बदलांसह भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध ३ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंशिवाय भारतीय संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंसह ट्वेंटी-२० मालिकेत श्रीलंकेचा सामना करेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी तो टीम इंडियाचा कर्णधार होता आणि श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. रोहित शर्माच्या अंगठ्याची दुखापत बरी होण्यासाठी जास्त वेळ लागणार होता. अशा परिस्थितीत हार्दिककडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पण, रोहित वन डे मालिकेतून पुनरागमन करणार आहे.
वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवणार आहे. भारताने नुकतीच बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपवली. श्रीलंका ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर दुसरी मालिका खेळणार आहे. श्रीलंकेने यापूर्वी भारताचा दौरा केला तेव्हा त्यांना एकही ट्वेंटी-२० सामना जिंकता आला नाही. ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये श्रीलंका आशियाई चॅम्पियन आहे.
पहिला सामना किती वाजता खेळवला जाईल?भारत आणि श्रीलंका यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना (IND vs SL) भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरू होईल.
थेट प्रक्षेपण तुम्ही कोणत्या चॅनलवर?स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. तुम्ही स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु, स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड वर भारत विरुद्ध श्रीलंका थेट प्रक्षेपण पाहू शकता.
लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे ?भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील T20 मालिकेचे थेट प्रवाह Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल. तुम्ही https://www.lokmat.com/sports/ येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या T20 सामन्याचे लाइव्ह अपडेट्स पाहू शकता. डीडी फ्री डिश प्लॅटफॉर्मद्वारे डीडी स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपण विनामूल्य पाहू शकता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"