IND vs SL Live updates : आशिया चषकात आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला असून शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अधिक अनुकूल असल्याने एक अतिरिक्त फिरकीपटूसह मैदानात उतरणार असल्याचे रोहितने नाणेफेकीवेळी सांगितले.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ - दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चॅरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, डुनिथ वेललेज, महीश थीक्षाना, कासुन राजिथा, मथीशा पथिराना.
आजचा सामना भारत आणि श्रीलंका या संघांसह पाकिस्तानसाठी देखील महत्त्वाचा असणार आहे. कारण आज जर भारतीय संघाने आशियाई किंग्जला नमवले तर शेजाऱ्यांना सुखद धक्का मिळेल. कारण आशिया चषकाच्या गुणतालिकेत आताच्या घडीला भारत अव्वल स्थानी आहे, तर श्रीलंका आणि पाकिस्तान अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. नेट रनरेटच्या बाबतीत देखील भारत शिखरावर आहे, तर श्रीलंका पाकिस्तानपेक्षा पुढे आहे. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेचा पराभव पाकिस्तानसाठी मदतशीर असेल.