India vs Sri Lanka : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एक वनडे मालिका जिंकली. भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या वन डेत श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव केला. या विजयात विराट कोहली ( १६६) , शुभमन गिल ( ११६) आणि मोहम्मद सिराज ( ४ विकेट्स) यांचा सर्वात मोठा वाटा होता. भारताच्या ३९० धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ ७३ धावांवर माघारी परतला. या मालिकेत विराट कोहलीला प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार दिला गेला, परंतु भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याला ही गोष्ट पटली नाही. गौतम गंभीरच्या मते हा पुरस्कार या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज मोहम्मद सिराज व विराट या दोघांना द्यायला हवा होता.
आता रोहित शर्मावर टीका व्हायला हवी! विराट फॉर्मात आला तसा गौतम गंभीरने मोर्चा कॅप्टनकडे वळवला
सिराज यांनी कौतुक केले
या मालिकेत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी केली. गुवाहाटीतील पहिल्या वन डे सामन्यात त्याने दोन विकेट्स आणि कोलकाता येथे झालेल्या पुढील सामन्यात तीन विकेट्स घेतल्या. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर म्हणाला, ''तो विराट कोहलीच्या बरोबरीचा होता आणि त्यामुळे मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार संयुक्तपणे त्यालाही द्यायला हवा होता. फलंदाजीसाठी योग्य खेळपट्ट्यांवर त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. तुम्ही नेहमी फलंदाजांना मालिकावीर पुरस्कार देता, परंतु सिराज पूर्णपणे अपवादात्मक होता, त्याने प्रत्येक सामन्यात चांगला खेळ केला होता.''
तीन सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीने दोन शतकांच्या मदतीने २८३ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १३७.३८ होता. दुसरीकडे सिराजने ९ विकेट घेतल्या. शेवटच्या सामन्यात त्याने पहिल्या १० षटकांतच श्रीलंकेच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले.
आता रोहित शर्मावर टीका व्हायला हवी!
गंभीर पुढे म्हणाला की,''विराटप्रमाणेच आपल्याला रोहितवरही टीका होण्याची गरज आहे. मागील तीन वर्ष विराटकडून शतक होत नव्हते, तेव्हा त्याच्यावर भरपूर टीका झाली. मग रोहितवरही प्रश्न उपस्थित करायला हवेत. कारण मागील ५० इनिंग्जमध्ये ( डाव) रोहितला शतक झळकावता आलेले नाही. ''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"