India vs Sri Lanka, ODI : भारताने ट्वेंटी-२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला आणि आता श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतही वर्चस्व गाजवण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. रोहित शर्मा, विराट कोहली हे विश्रांतीनंतर संघात पुनरागमन करणार आहेत. पण, सर्वांचे लक्ष लागले आहे ते जसप्रीत बुमराहकडे ( Jasprit Bumrah)... मागील अनेक महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहची श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत अनपेक्षित निवड केली गेली. BCCI च्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने ( NCA) जसप्रीत बुमराह तंदुरुस्त असल्याचे रिपोर्ट कार्ड दिला अन् बीसीसीआयने लगोलग त्याची वन डे मालिकेसाठी संघात निवड केली. पण, आता हाती आलेल्या बातमीनुसार तो वन डे मालिकेत खेळणार नसल्याचे समजते आहे.
सूर्यकुमार यादव पाकिस्तानचा खेळाडू असता तर...! भारताच्या स्टारची फटकेबाजी पाहून 'सलमान'चं विधान
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने दुखापतग्रस्त जसप्रीतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळवले आणि त्याचा परिणाम त्याची दुखापत बळावली अन् त्याला वर्ल्ड कपला मुकावे लागले. आताही जसप्रीतला वन डे संघात सहभागी करून घेण्याचा अतिउत्साह बीसीसीआयने दाखवला. पण, वेळीच त्यांचे डोकं भानावर आले आणि त्यांनी जसप्रीतला वन डे मालिकेत न खेळवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त Cricbuzz ने दिले आहे. जसप्रीतबाबत आधी केलेले चूक पुन्हा होऊ नये, यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. प्रमुख गोलंदाजाच्या बाबतीत BCCI ला आता घाई करायची नाही.
पहिल्या वन डे सामन्यासाठी गुवाहाटी येथे पोहोचलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये जसप्रीत नाही. बीसीसीआयने २९ वर्षीय जसप्रीतचा आयत्याक्षणी वन डे संघात समावेश केला होता. बीसीसीआयच्या निवड समितीने जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरूस्त असल्याचे जाहीर केले आणि श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याचा संघात समावेशही केला. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतून तो पुनरागमन करणार होता. सप्टेंबर २०२२ पासून जसप्रीत क्रिकेटपासून दूर आहे. पण, त्याच्या पुनरागमनासाठी चाहत्यांना आणखी काहीकाळी प्रतीक्षा पाहावी लागणार आहे.
भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उम्रान मलिक, अर्शदीप सिंग( India's updated squad for Sri Lanka ODIs: Rohit Sharma (Captain), Shubman Gill, Virat Kohli, Suryakumar Yadav, Shreyas Iyer, KL Rahul (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya (VC), Washington Sundar, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Axar Patel, Mohd. Shami, Mohd. Siraj, Umran Malik and Arshdeep Singh.)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"