IND vs SL, ODI Series : BCCI चा यू टर्न! ६ दिवसांपूर्वी १०० टक्के फिट असलेल्या जसप्रीत बुमराहची मालिकेतून माघार

India vs Sri Lanka, ODI : भारताने ट्वेंटी-२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला आणि आता श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतही वर्चस्व गाजवण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 03:51 PM2023-01-09T15:51:20+5:302023-01-09T15:52:37+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, ODI Series : Team India pacer Jasprit Bumrah has been ruled out of the upcoming 3-match ODI series against Sri Lanka | IND vs SL, ODI Series : BCCI चा यू टर्न! ६ दिवसांपूर्वी १०० टक्के फिट असलेल्या जसप्रीत बुमराहची मालिकेतून माघार

IND vs SL, ODI Series : BCCI चा यू टर्न! ६ दिवसांपूर्वी १०० टक्के फिट असलेल्या जसप्रीत बुमराहची मालिकेतून माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
  • ३ जानेवारी २०२२ : गोलंदाज जसप्रीत बुमराह बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी दाखल झाला होता आणि तो पूर्णपणे बरा असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळेच त्याचा श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत संघात समावेश केला आहे आहे, BCCI ने केली घोषणा.
  • ९ जानेवारी २०२२ : जसप्रीत बुमराहला अद्याप गोलंदाजीच्या लयमध्ये येण्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्यामुळे खरबरादीचा उपाय म्हणून त्याला श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून माघार घ्यावी लागत आहे, BCCI ने केले जाहीर.

 

India vs Sri Lanka, ODI : भारताने ट्वेंटी-२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला आणि आता श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतही वर्चस्व गाजवण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. रोहित शर्मा, विराट कोहली हे विश्रांतीनंतर संघात पुनरागमन करणार आहेत. जसप्रीत बुमराहला ( Jasprit Bumrah) आधी तंदुरुस्त जाहीर केल्यामुळे त्याच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बुमराहची श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत अनपेक्षित निवड केली गेली होती. पण, सहा दिवसांत बीसीसीआयने त्यांच्या निर्णयावरून पलटी मारली.  
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने दुखापतग्रस्त जसप्रीतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळवले आणि त्याचा परिणाम त्याची दुखापत बळावली अन् त्याला वर्ल्ड कपला मुकावे लागले. आताही जसप्रीतला वन डे संघात सहभागी करून घेण्याचा अतिउत्साह बीसीसीआयने दाखवला. पण, आता बीसीसीआयने बुमराहला वन डे मालिकेत न खेळवण्याचा निर्णय घेतल्याचे बीसीसीआयने जाहीर केले. जसप्रीतच्या जागी बदली खेळाडू बीसीसीआयने निवडलेला नाही.

पहिल्या वन डे सामन्यासाठी गुवाहाटी येथे पोहोचलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये जसप्रीत नाही. बीसीसीआयने २९ वर्षीय जसप्रीतचा आयत्याक्षणी वन डे संघात समावेश केला होता.  बीसीसीआयच्या निवड समितीने जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरूस्त असल्याचे जाहीर केले आणि श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याचा संघात समावेशही केला. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतून तो पुनरागमन करणार होता. सप्टेंबर २०२२  पासून जसप्रीत क्रिकेटपासून दूर आहे. पण, त्याच्या पुनरागमनासाठी चाहत्यांना आणखी काहीकाळी प्रतीक्षा पाहावी लागणार आहे.


भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उम्रान मलिक, अर्शदीप सिंग ( India’s updated squad for Sri Lanka ODIs: Rohit Sharma (Captain), Shubman Gill, Virat Kohli, Suryakumar Yadav, Shreyas Iyer, KL Rahul (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya (VC), Washington Sundar, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Axar Patel, Mohd. Shami, Mohd. Siraj, Umran Malik, Arshdeep Singh.) 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs SL, ODI Series : Team India pacer Jasprit Bumrah has been ruled out of the upcoming 3-match ODI series against Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.