IND vs SL ODI, Virat Kohli: विराट कोहलीचा 'सुपर शो' सुरूच! ठोकले 74 वे आंतरराष्ट्रीय शतक; रचला इतिहास 

India vs Sri Lanka 3rd ODI Live: भारत - श्रीलंका यांच्यातला तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 04:49 PM2023-01-15T16:49:17+5:302023-01-15T16:49:56+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL ODI Virat Kohli scored his 74th century in international cricket with an 85-ball 100 in the third ODI against Sri Lanka    | IND vs SL ODI, Virat Kohli: विराट कोहलीचा 'सुपर शो' सुरूच! ठोकले 74 वे आंतरराष्ट्रीय शतक; रचला इतिहास 

IND vs SL ODI, Virat Kohli: विराट कोहलीचा 'सुपर शो' सुरूच! ठोकले 74 वे आंतरराष्ट्रीय शतक; रचला इतिहास 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारत - श्रीलंका यांच्यातला तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. भारतीय संघाने मालिका आधीच खिशात घातली असल्यामुळे या सामन्यात संघात बदल पाहायला मिळणे अपेक्षित होते. अखेरच्या वन डे सामन्यात सूर्यकुमार यादवला संधी मिळाली आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शानदार सुरूवात केली. भारताकडून शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी शतकी खेळी करून पाहुण्या संघासमोर धावांचा डोंगर उभारला आहे. 

पहिल्या बळीसाठी भारतीय सलामीवीरांनी 95 धावांची भागीदारी नोंदवली. मात्र, कर्णधार रोहित शर्मा आपल्या अर्धशतकाला मुकला आणि 42 धावांवर बाद झाला. हिटमॅनने 3 षटकार आणि 2 चौकार ठोकून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दबाव टाकला होता. पण पाहुण्या संघाने पुनरागमन करताना चमिका करूणारत्नेने रोहितला बाद करून श्रीलंकेच्या चाहत्यांना जागे केले. पण शुबमन गिलने एका बाजूने धावसंख्या वाढवत नेली. ज्याला किंग कोहलीने चांगली साथ दिली. शुबमन गिलने 97 चेंडूत 116 धावांची शतकी खेळी केली आणि भारताला मजबूत स्थितीत पोहचवले. 14 चौकार आणि 2 षटकारांच्या गिलच्या खेळीला कसुन रजिथाने ब्रेक लावला आणि भारताला दुसरा झटका दिला. 

किंग कोहलीचा सुपर शो 
विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी दुसऱ्या बळीसाठी 131 धावांची उल्लेखणीय भागीदारी केली. किंग कोहलीने 85 चेंडूत 100 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या शतकी खेळीत 10 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. सध्या 43 षटकांपर्यंत भारताची धावसंख्या 2 बाद 303 एवढी झाली आहे. विराट कोहली (100) आणि श्रेयस अय्यर (34) धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. 

गिल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर खेळपट्टीवर आला जो संयमी खेळी करून किंग कोहलीला साथ देत आहे. विराटने या मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील शतक ठोकून इतिहास रचला आहे. आजचे विराट कोहलीचे शतक त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 74वे शतक ठरले आहे. तर वन डे मधील विराटचे हे 46वे शतक आहे. त्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी किंग कोहली आणखी 3 शतकी खेळीपासून दूर आहे. कारण वन डे क्रिकेटच्या इतिहासात सचिनने सर्वाधिक 49 शतके झळकावली आहेत. 

शुबमन गिलचे शतक 
शुबमन गिलने सुरूवातीपासून ताबडतोब खेळी करून डावाची सुरूवात केली. त्याने एकाच षटकांत 4 चौकार ठोकून आपले लक्ष्य दाखवून दिले होते. त्याने 2 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 89 चेंडूत 100 धावांची शतकी खेळी केली. खरं तर शुबमन गिलचे वन क्रिकेटमध्ये मायदेशातील हे पहिलेच शतक आहे. 

 

किंग कोहलीचा नवा विक्रम 
विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म या मालिकेतही कायम आहे. या सामन्यापूर्वी त्याने 267 वन डे सामन्यांमध्ये 12588 धावा केल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने 62 धावांचा आकडा गाठताच वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत महेला जयवर्धनेला मागे टाकले. विराटच्या या खेळीपूर्वी महेला जयवर्धने वन डेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत 5व्या स्थानावर होता, मात्र आता विराटने हे स्थान गाठले आहे. वन डे  क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. सचिन तेंडुलकरच्या वनडेत एकूण 18426 धावा आहेत. यानंतर या यादीत श्रीलंकेच्या कुमार संगकाराचे नाव आले आहे. त्याने वन डे क्रिकेटमध्ये एकूण 14234 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रिकी पाँटिंगने वन डे क्रिकेटमध्ये 13704 धावा केल्या आहेत आणि सनथ जयसूर्याने 13430 धावा केल्या आहेत.

भारतीय संघात मोठा बदल 
भारताने दोन्ही वन डे सामन्यात सहज विजय मिळवला. पहिल्या वन डेत विराट कोहलीचे शतक महत्त्वाचे ठरले, तर दुसऱ्या वन डेत कुलदीप यादव, मोहम्मद सिराज यांचा अचूक मारा आणि लोकेश राहुलच्या संयमी खेळीने भारताला विजय मिळवून दिले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देऊन आज इशान किशन व सूर्यकुमार यादव याला संधी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मोहम्मद शमीलाही विश्रांती मिळेल अशी शक्यता होती. हार्दिक पांड्या व उमरान मलिक यांना आजच्या सामन्यात विश्रांती दिली गेली असून त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर व सूर्यकुमार यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद समी, मोहम्मद सिराज. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs SL ODI Virat Kohli scored his 74th century in international cricket with an 85-ball 100 in the third ODI against Sri Lanka   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.