Virat Kohli : तीन वनडे मालिकेसाठी भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. मात्र आता विराट कोहलीसोबत गैरवर्तन झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोलंबोमध्ये विराट कोहलीला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोहली सराव करत असताना एका चाहत्याने त्याला विचित्र नावाने ओरडून हाक मारायला सुरुवात केली. मात्र त्यानंतर संपातलेल्या विराट कोहलीने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. कोहलीच्या चाहत्यांकडूनही याविषयी रोष व्यक्त केला जात आहे.
विराट कोहलीचा श्रीलंकेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तो ड्रेसिंग रूमच्या बाहेर शॅडो प्रॅक्टिस करताना दिसत आहे. त्यावेळी एका क्रिकेट चाहत्याना त्याला चिडवण्यासाठी चोकली असं म्हटलं. हे शब्द ऐकताच विराट कोहलीने त्याच्याकडे एकटक रागाने पाहिले. चाहत्याने विराटला पाहताच चोकली-चोकली असे ओरडायला सुरुवात केली. कोहलीने लगेच त्या दिशेने पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की तो खूप रागावलेला आहे.
सोशल मीडियावर विराट कोहलीला ट्रोल करण्यासाठी नेटकरी चोकली हा शब्द वापरतात. हा शब्द 'कोहली' आणि 'चोक' मिळून बनला आहे. कोहली मोठ्या सामन्यांमध्ये भारतासाठी चांगली कामगिरी करू शकत नाही, असे या ट्रोलर्सचे मत आहे. त्यामुळे त्याला चोकली या नावाचे चिडवलं जातं.
२०१९ च्या वर्ल्डकपमधून भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा हा शब्द वापरण्यात आला होता. त्यावेळी विराट कोहली फक्त एक धाव घेऊन बाद झाला होता. आयसीसी स्पर्धेच्या नॉकआऊट सामन्यात एक धावा काढून कोहली बाद होण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी २०१५ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध असाच प्रकार घडला होता. तेव्हापासून विराटला या नावाने चिडवलं जात आहे.
दरम्यान, टी-२० वर्ल्डकपनंतर विराट कोहली पहिल्यांदा मैदानात उतरत आहे. विराट सोमवारी सकाळी श्रीलंकेत पोहोचला होता. मात्र सोमवारी पहिला सराव पावसामुळे रद्द करण्यात आला. मंगळवारी झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलनंतर कोहलीने पहिल्यांदाच नेट प्रॅक्टिस केली.
Web Title: IND vs SL ODI Virat Kohli was mistreated during Sri Lanka tour
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.