IND vs SL, Asia Cup 2023 Ravindra Jadeja Record : भारतीय संघाने श्रीलंकेवर सुपर 4 च्या सामन्यात ४१ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २१३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाला १७२ धावाच करता आल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार बळी टिपले. फिरकीपटू जाडेजाने देखील २ बळी टिपले. त्यासोबत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने आशिया कप 2023 मध्ये एक मोठा विक्रम रचला. भारतासाठी आशिया कप स्पर्धेत वन डे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत जाडेजा पहिल्या क्रमांकावर पोहोचला. या प्रकरणात त्याने माजी भारतीय गोलंदाज इरफान पठाणला मागे टाकले आहे. आधी इरफानच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला होता. आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये जाडेजाने ही कामगिरी केली आहे.
रवींद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात दासून शनाकाला बाद करताना ही कामगिरी केली. भारतीय संघासाठी इरफान पठाणने आशिया कपमध्ये 12 सामने खेळले आणि 27.50 च्या सरासरीने 22 विकेट घेतल्या. हा सामना सुरू होण्यापूर्वी जडेजाच्या नावावरही तेवढ्याच विकेट्स होत्या. मात्र, आता जडेजाने आशिया कपमध्ये 18 सामन्यांनंतर 24 विकेट घेतल्या आहेत.
आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा महान माजी खेळाडू मुथय्या मुरलीधरन पहिल्या स्थानावर आहे. आशिया कपच्या इतिहासात मुरलीने 24 सामने खेळताना 30 विकेट्स घेतल्या. यानंतर लसिथ मलिंगा 29 विकेट्ससह दुसऱ्या आणि अंजता मेंडिस 26 विकेट्ससह तिसऱ्या स्थानी आहे. तर जाडेजा सध्या या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे.
Web Title: IND vs SL Ravindra Jadeja Record leading wicket taker in Asia Cup history in ODI format
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.