India vs Sri Lanka T20 : Hardik Pandya to lead India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI) बुधवारी बैठक पार पडली अन् त्यानंतर टीम इंडियात परिवर्तनाची लाट पाहायला मिळणार आहे. या बैठकीत ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाबाबत काहीच चर्चा झाली नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार आता टीम इंडियात खांदेपालट होणार हे नक्की आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) हा नवीन वर्षातील पहिल्याच मालिकेत टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला ३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मुंबईत पहिली लढत होईल आणि त्यानंतर पुणे ( ५ जानेवारी ) व राजकोट ( ७ जानेवारी) येथे अनुक्रमे दुसरी व तिसरी मॅच होईल.
८ विकेट्स अन् ४० धावा करणाऱ्या कुलदीप यादवला बाहेर का काढलं? लोकेश राहुलने कारण दिलं
बांगलादेश दौऱ्यावर दुसऱ्या वन डे सामन्यात अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्माला तिसरी वन डे व दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील एक्झिट नंतर रोहितकडून ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व काढून हार्दिककडे दिले जाईल, अशी चर्चा आहे. रोहित ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण, २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने रोहितसह विराट, अश्विन आदी सीनियर सदस्यांना ट्वेंटी-२०पासून दूर ठेवले जाईल हे निश्चित आहे.
रोहितची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही आणि तो श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतही खेळण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले जात आहे. अशा परिस्थिती हार्दिक नेतृत्व करेल. रोहितची ही माघार नेमकी दुखापतीमुळे आहे की आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या स्कीममध्ये नसल्याने आहे, यावर चर्चा सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको.
भारत-श्रीलंका मालिका
पहिली ट्वेंटी-२० - ३ जानेवारी, मुंबईदुसरी ट्वेंटी-२० - ५ जानेवारी, पुणेतिसरी ट्वेंटी-२० - ७ जानेवारी, राजकोट
पहिली वन डे - १० जानेवारी, गुवाहाटीदुसरी वन डे - १२ जानेवारी, कोलकातातिसरी वन डे - १५ जानेवारी, तिरुअनंतपुरम
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"