Press Conference BCCI : २७ जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेच्या धरतीवर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाईल. टीम इंडियाचा नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीरची प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच परीक्षा आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध बांबीवर प्रकाश टाकला. यावेळी आगरकरने सूर्याला कर्णधार बनवल्याचे कारण सांगताना हार्दिकच्या फिटनेसबद्दल भाष्य केले.
अजित आगरकर म्हणाला की, सूर्यकुमार यादव कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार असल्याने त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. तो ट्वेंटी-२० मधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. सर्व फॉरमॅट खेळू शकेल असा कर्णधार असावा असे सर्वांनाच वाटते. हार्दिक पांड्याच्या फिटनेसच्या समस्यामुळे त्याला वगळण्यात आले.
प्रशिक्षक गंभीरला अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांच्याबद्दल प्रश्न केला असता तो म्हणाला की, संघातून वगळलेल्या प्रत्येकाला खेळाडूला वाईट वाटणे हे साहजिकच आहे. रिंकू सिंगकडे पाहा त्याने ट्वेंटी-२० विश्वचषकापूर्वी खरोखरच खूप चांगली कामगिरी केली. पण, त्यालाही संधी मिळाली नाही. आम्ही केवळ १५ खेळाडूंची निवड करू शकतो.
भारताचा वन डे संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
भारताचा ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.
वन डे मालिकेचे वेळापत्रक - पहिला सामना - २ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.दुसरा सामना - ४ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.तिसरा सामना - ७ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.