इंदूर, भारत विरुद्ध श्रीलंका : दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारतापुढे १४२ धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने यावेळी सर्वाधिक तीन विकेट्सची कमाई केली.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण ही सुरुवात आक्रमक नव्हती. पण श्रीलंकेचा पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र त्यांना सातत्याने धक्के बसत गेले. त्यामुळे श्रीलंकेला यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
श्रीलंकेला पहिला धक्का वॉशिंग्टन सुंदरने दिला. त्यानंतर कुलदीप यादवने डबल धमाका उडवला. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनेही यावेळी श्रीलंकेला दोन धक्के दिल्याचे पाहायला मिळाले.