IND vs SL T20 ODI Series, Team India: भारत आणि श्रीलंका यांच्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये वन-डे आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. त्या दौऱ्याचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका २६ जुलैपासून सुरू होणार आहे, तर वन-डे मालिका १ ऑगस्टपासून खेळण्यात येणार आहे. टी-20 मालिका पल्लेकल येथे खेळवली जाईल, तर वनडे मालिकेतील तीनही सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील. या दौऱ्यावर रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह या खेळाडूंना विश्रांती दिली जाणार असून एका स्टार खेळाडूचे पुनरागमन होणार असल्याची चर्चा आहे. टीम इंडियाचा श्रीलंका दौरा हा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची पहिली परीक्षा असणार आहे. त्यामुळे गंभीर काय विचार करतो हेदेखील महत्त्वाचे असणार आहे.
- या आठवड्याच्या अखेरीस होऊ शकते संघाची घोषणा
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. या आठवड्याच्या अखेरीस संघाची घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, T20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्त झालेला कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दौऱ्यावर जाणार नाहीत. ते विश्रांती घेणार आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय T20 संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवले जाऊ शकते. तर वर्ल्डकपच्या संघात नसलेला स्टार खेळाडू केएल राहुल वनडे मालिकेसाठी संघात पुनरागमन करू शकतो आणि रोहितच्या अनुपस्थितीत संघाचे कर्णधारपद भूषवू शकतो.
- दोन्ही संघात सूर्यकुमारची निवड होऊ शकते
या दौऱ्यावरील वनडे आणि टी२० चे संघ फारसे वेगळे नसतील. कदाचित केएल राहुलला टी२० संघातून वगळले जाईल. पण संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांना दोन्ही संघात स्थान मिळू शकते. कुलदीप यादवला वनडेमध्ये जागा मिळू शकेल.
रिपोर्ट्सनुसार, रोहित व्यतिरिक्त कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील या दौऱ्यावर विश्रांती घेऊ शकतात. अशा स्थितीत कोहलीच्या जागी संजू सॅमसन किंवा कर्णधार केएल राहुल हे वनडेत तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतात आणि दोन्ही संघात सूर्यकुमार यादवची निवड होऊ शकते.
भारताचा संभाव्य टी२० संघ-हार्दिक पांड्या (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, खलील अहमद, आवेश खान आणि मोहम्मद सिराज.
भारताचा संभाव्य वनडे संघ- केएल राहुल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान आणि मोहम्मद सिराज.
Web Title: Ind vs SL T20 ODI Series star cricketer to make comeback Team India head coach Gautam Gambhir KL Rahul
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.