KKR on Shreyas Iyer, IND vs SL, T20 Series : ३ डाव, २०४ धावा, सरासरी किती?; श्रेयस अय्यरचा फॉर्म अन् कोलकाता नाइट रायडर्सचा प्रश्न, बघा तुम्हाला सापडतंय का उत्तर 

India vs Sri Lanka, T20 Series : भारतीय संघाने सलग तिसऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत निर्भेळ यश मिळवले. रविवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने ६ विकेट्स राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 10:34 AM2022-02-28T10:34:31+5:302022-02-28T10:35:16+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, T20 Series : 204 runs, 3 innings, SR 174.35, Average _____ ?, Kolkata Knight Riders Tweets goes viral After Shreyas Iyer fantastic performance  | KKR on Shreyas Iyer, IND vs SL, T20 Series : ३ डाव, २०४ धावा, सरासरी किती?; श्रेयस अय्यरचा फॉर्म अन् कोलकाता नाइट रायडर्सचा प्रश्न, बघा तुम्हाला सापडतंय का उत्तर 

KKR on Shreyas Iyer, IND vs SL, T20 Series : ३ डाव, २०४ धावा, सरासरी किती?; श्रेयस अय्यरचा फॉर्म अन् कोलकाता नाइट रायडर्सचा प्रश्न, बघा तुम्हाला सापडतंय का उत्तर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, T20 Series : भारतीय संघाने सलग तिसऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत निर्भेळ यश मिळवले. रविवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या मालिकेत श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) सर्वांना दखल घेण्यास भाग पाडले. तिसऱ्या सामन्यात सामनावीर ठरलेला अय्यर मालिकावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला. अय्यरचा फॉर्म पाहून आयपीएल ( IPL 2022) मधील कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघ भलताच खूश झाला आणि त्यांनी १५व्या पर्वाआधी मोठा दावा केला. KKRने आगामी आयपीएलसाठी अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याच्यासाठी फ्रँचायझीने १४ कोटी रुपये मोजले. 


श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १४६ धावा केल्या दासून शनाकाने ३८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७४ धावांची खेळी केली. अखेरच्या पाच षटकांत त्यांनी एकही विकेट न गमावता ६८ धावा केल्या. रोहित शर्मा ( १ ),  संजू सॅमसन ( १८), दीपक हुडा ( २१) आज अपयशी ठरले. वेंकटेश अय्यरलाही ( ५) आज संधीचं सोनं करता आले नाही.श्रेयस आणि रवींद्र जडेजा या जोडीने पाचव्या विकेटसाठी २७ चेंडूंत नाबाद  ४५ धावांची भागीदारी केली. या दोघांनी अगदी सहजतेनं भारताला ६ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. श्रेयस ४५ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ७३ धावांवर, तर जडेजा २२ धावांवर नाबाद राहिले. 

श्रेयस अय्यरने या मालिकेत १७४.३५ च्या स्ट्राईक रेटने नाबाद २०४ धावा केल्या. श्रीलंकेला तीन सामन्यांच्या मालिकेत श्रेयसला एकदाही बाद करता आले नाही. त्याने या मालिकेत ५७*, ७४* व ७३* अशी खेळी केली. तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत २००+ धावा करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला. त्याने विराटचा ( वि. ऑस्ट्रेलिया, २०१६) १९९ धावांचा विक्रम मोडला.   एका ट्वेंटी-२० मालिकेत सलग तीन ५०+ धावा करणारा तो विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय ठरला. विराटने २०१२ मध्ये ( वि. श्रीलंका, न्यूझीलंड व अफगाणिस्ता), २०१४ मध्ये ( वि. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड) आणि २०१६ मध्ये ( वि. ऑस्ट्रेलिया) सलग तीन सामन्यांत ५०+ धावांचा पराक्रम केला होता.  


 द्विदेशीय तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत १००+ धावा करून नाबाद राहाणारा श्रेयस हा जगातील तिसरा फलंदाज ठरला. याआधी डेव्हिड वॉर्नरने २०१९मध्ये श्रीलंकेविरुद्ध २१७* आणि अफगाणिस्तानच्या नजिबुल्लाह झाद्रानने २०१६मध्ये यूएईविरुद्ध १०४* धावा केल्या होत्या. 

कोलकाता नाईट रायडर्स : व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, श्रेयस अय्यर (१२.२५ कोटी), नितीश राणा ( ८ कोटी), पॅट कमिन्स ( ७.२५ कोटी), मोहम्मद नबी ( १ कोटी), सॅम बिलिंग ( २ कोटी), उमेश यादव ( २ कोटी),   शिवम मावी ( ७.२५ कोटी),  शेल्डन जॅक्सन  ( ६० लाख), अजिंक्य रहाणे ( १ कोटी), रिंकू सिंग ( ५५ लाख), अनुकूल रॉय (  २० लाख), अॅलेक्स हेल्स ( १.५० कोटी), रसिख दार ( २० लाख), टीम साऊदी ( १.५० कोटी), बाबा इंद्रजित ( २० लाख), चमिका करुणारत्ने ( ५० लाख), अभिजित तोमर ( ४० लाख), प्रथम सिंग ( २० लाख), अशोक शर्मा ( ५५ लाख), अमन खान ( २० लाख), रमेश कुमार ( २० लाख). 

Web Title: IND vs SL, T20 Series : 204 runs, 3 innings, SR 174.35, Average _____ ?, Kolkata Knight Riders Tweets goes viral After Shreyas Iyer fantastic performance 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.