Team India Jersey, IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर पहिल्या T20 सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने असतील. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ही मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या जर्सीत एक महत्त्वाचा बदल झाल्याचे दिसून आला. मालिका सुरू होण्यापूर्वी खेळाडूंचे फोटोशूट झाले, त्यानंतर युजवेंद्र चहलने एक फोटो शेअर केला. यामध्ये श्रीलंका मालिकेत सहभागी झालेल्या गोलंदाजी युनिटचा समावेश आहे. चित्रात युझवेंद्र चहल व्यतिरिक्त उमरान मलिक, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार तसेच ऋतुराज गायकवाड आहेत. त्या फोटोमध्ये त्यांच्या जर्सीवरील फरक लगेचच स्पष्ट दिसला.
टीम इंडिया या मालिकेत नवीन जर्सी घेऊन परिधान करून खेळत आहे. आता टीम इंडियाच्या जर्सीवर नवीन किट प्रायोजकाचे नाव दिसणार आहे. यापूर्वी BCCIच्या लोगोशिवाय MPL स्पोर्ट्सचे नाव दिसत होते, मात्र आता तेथे KILLER हे नाव लिहिलेले दिसणार आहे. टीम इंडियाचे किट प्रायोजकत्व आतापर्यंत MPL स्पोर्ट्सकडे होते. हे प्रायोजकत्व डिसेंबर २०२३ पर्यंत या कंपनीकडे असणार होते. पण त्यांनी शेवटच्या वर्षाचे कंत्राट Kewal Kiran Clothing Limit ला दिले. त्यामुळे आता टीम इंडियाच्या जर्सीवर किलर कंपनीचा लोगो असणार आहे.
टी२० मालिकेसाठी भारताचा संघ-
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.
भारत-श्रीलंका टी२० मालिका
• पहिली टी२० - ३ जानेवारी, मुंबई• दुसरी टी२० - ५ जानेवारी, पुणे• तिसरा T20 - ७ जानेवारी, राजकोट