India vs Sri Lanka T20I Series : वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका गाजवल्यानंतर टीम इंडिया आता घरच्या मैदानावर श्रीलंकेचा सामना करणार आहे. विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत हे खेळाडू या मालिकेत खेळणार नाहीत, परंतु तीन महिन्यांच्या गॅपनंतर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे जडेजा वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेला मुकला होता. पण, आता गुरुवारपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याची एन्ट्री पक्की मानली जात आहे. जडेजाचे अंतिम ११मध्ये येणे म्हणजे विंडीजविरुद्धची मालिका गाजवणाऱ्या वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल किंवा रवी बिश्नोई यांच्यापैकी एकाला बाकावर बसावे लागेल.
- वेंकटेश अय्यरने विंडीजविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात आपल्या फलंदाजीची झलक दाखवली आहे. त्याने शेवटच्या दोन सामन्यांत रिषभ पंत व सूर्यकुमार यादव यांच्यासोबत उपयुक्त भागीदारी केली. तीन सामन्यांत त्याने ९२च्या सरासरीने ९२ धावा केल्या.
- हर्षल पटेलने डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करताना भारताला विजय मिळवून दिला. विंडीजविरुद्धच्या मालिकेत भारताकडून सर्वाधिक ५ विकेट्स हर्षलने घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला बसवण्याचा विचार रोहित नक्कीच करणार नाही.
- रवी बिश्नोईने या मालिकेतून भारतीय संघात पदार्पण केले. युवा खेळाडूने पहिल्याच सामन्यात १७ धावांत २ विकेट्स घेत प्रभावित केले, परंतु दुसऱ्या सामन्यात त्याची धुलाई झाली. त्यामुळे बिश्नोईला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात जडेजासाठी बाकावर बसवले जाऊ शकते.
- दीपक चहरच्या दुखापतीचे अपडेट्स समोर आलेले नाही, परंतु तो या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. अशात शार्दूल ठाकूरचे खेळणे निश्चित समजले जात आहे. पण, जसप्रीत बुमराहच्याही पुनरागमनामुळे त्याचाही मार्ग अवघड झाला आहे. मोहम्मद सिराजलाही बाकावर बसवले जाऊ शकते.
भारताचा T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान
सुधारित वेळापत्रकपहिली ट्वेंटी-२० - २४ फेब्रुवारी, लखनौदुसरी ट्वेंटी-२० - २६ फेब्रुवारी, धर्मशालातिसरी ट्वेंटी-२० - २७ फेब्रुवारी, धर्मशालापहिली कसोटी - ४ ते ८ मार्च, मोहालीदुसरी कसोटी - १२ ते १६ मार्च ( डे नाईट), बंगळुरू