IND vs SL, T20I : भारताचे दोन, तर श्रीलंकेच्या एका खेळाडूची मालिकेतून माघार; ऑल राऊंडरचा कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

India vs Sri Lanka, T20I Series - भारत-श्रीलंका यांच्यातली ट्वेंटी-२० मालिका गुरुवारपासून सुरू होत आहे आणि त्याआधी भारतायी संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. दीपक चहर ( Deepak Chahar ) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी दुखापतीमुळे माघार घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 11:19 AM2022-02-23T11:19:01+5:302022-02-23T11:37:33+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, T20I : Wanindu Hasaranga to miss T20Is vs India, He is yet to recover from COVID-19 and has tested positive in the latest PCR test, Still in Australia | IND vs SL, T20I : भारताचे दोन, तर श्रीलंकेच्या एका खेळाडूची मालिकेतून माघार; ऑल राऊंडरचा कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

IND vs SL, T20I : भारताचे दोन, तर श्रीलंकेच्या एका खेळाडूची मालिकेतून माघार; ऑल राऊंडरचा कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, T20I Series - भारत-श्रीलंका यांच्यातली ट्वेंटी-२० मालिका गुरुवारपासून सुरू होत आहे आणि त्याआधी भारतायी संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. दीपक चहर ( Deepak Chahar ) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी दुखापतीमुळे माघार घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातं दीपकच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते आणि त्याने १.५ षटक फेकून  मैदान सोडले होते. त्यानंतर सूर्यकुमार यादवला मंगळवारी सराव सत्रात हाताला दुखापत झाली आणि त्यालाही माघार घ्यावी लागली. हे दोन्ही खेळाडू आता बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होणार आहेत. भारतीय संघाला दोन धक्के बसलेले असताना पाहुण्या श्रीलंकेच्या ताफ्यातूनही वाईट बातमी आली आहे. त्यांचा प्रमुख अष्टपैलू खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यालाही या मालिकेत खेळता येणार नाही.

श्रीलंकेच्या संघाला नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत १-४ असा दारूण पराभव पत्करावा लागला आहे. श्रीलंकेने पाचव्या सामन्यात ५ विकेट्स राखून सामना जिंकून व्हाईट वॉश टाळला होता. मालिकेचा निकाल श्रीलंकेच्या विरोधात लागला असला तरी त्यांच्या काही खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. कुसल मेंडिसने ५०च्या सरासरीने १०० धावा केल्या. निसांकाने सर्वाधिक १८४ धाववा केल्या. तिक्ष्णाने पाच विकेट्, दुश्मंथाने ७ विकेट्स घेतल्या. वनिंदू हसरंगानेही दोन सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या.  

वनिंदू हसरंगाचा ताजा RTPCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्याला ऑस्ट्रेलियातच विलगीकरणार रहावे लागले आहे. त्यामुळे तो भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही. Wanindu Hasaranga ruled out of the T20 series against India.

श्रीलंकेचा ट्वेंटी-२० संघ - दासून शनाका, चरिथ असालांका, पथुम निसांका, कुशल मेंडिस, दिनेश चंडीमल, धनुष्का गुणातिलका, कामिल मिशारा, जनथ लियानागे, वनिंदू हसरंगा, चामिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, दुश्मंथा चमीरा, बिनुरा फर्नाण्डो, शिरन फर्नाण्डो, महीश तिक्ष्णा, जॅफरी वेंडरसे, प्रवीन जयाविक्रमा, आशियान डेनियल.  


भारताचा T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक),  श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान

भारत-श्रीलंका सुधारित वेळापत्रक
पहिली ट्वेंटी-२० - २४ फेब्रुवारी, लखनौ
दुसरी ट्वेंटी-२० -  २६ फेब्रुवारी, धर्मशाला
तिसरी ट्वेंटी-२० - २७ फेब्रुवारी, धर्मशाला
पहिली कसोटी - ४ ते ८ मार्च, मोहाली
दुसरी कसोटी - १२ ते १६ मार्च ( डे नाईट),  बंगळुरू 

Web Title: IND vs SL, T20I : Wanindu Hasaranga to miss T20Is vs India, He is yet to recover from COVID-19 and has tested positive in the latest PCR test, Still in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.