भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला एक असा घातक वेगवान गोलंदाज मिळाला आहे, जो भविष्यात जसप्रीत बुमराहच्या करिअरसाठी मोठा धोका बनू शकतो. हा वेगवान गोलंदाज एवढा घातक आहे, की खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनाही घाम फोडतो. आता हा क्रिकेटर क्रिकेट T20, कसोटी आणि ODI या तिनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा सर्वात आवडता वेगवान गोलंदाज बनला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडही या खेळाडूच्या कामगिरीवर जाम खुश आहेत. असून आता हा वेगवान गोलंदाज दीर्घकाळ टीम इंडियाकडून खेळत राहणार आहे.
टीम इंडियाला मिळाला घातक गोलंदाज - आता टीम इंडियाला मिळालेला हा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या करिअरसाठीही धोका ठरू शकतो. हा घातक वेगवान गोलंदाज दुसरा-तिसरा कुणी नसून मोहम्मद सिराज आहे. कोलकात्याच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजी करताना 3 बळी घेतले. जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचे झाल्यास आता तो दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर राहणार आहे. सध्या टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासूनही दूर जाऊ शकतो. जसप्रीत बुमराहला जुलै 2022 मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर कंबरेचे 'स्ट्रेस फ्रॅक्चर' झाले होते आणि आता तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे आणि टीम इंडियामधून अनिश्चित काळासाठी बाहेर आहे. यामुळे आता जसप्रीत बुमराहला पर्याय म्हणून संघ व्यवस्थापन मोहम्मद सिराजला तयार करत आहे. मोहम्मद सिराजची लाईन आणि लेंग्थ अत्यंत अचूक आहे. महत्वाचे म्हणजे तो स्लो बॉलवर विकेट घेण्यात पटाईत आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे, मोहम्मद सिराजने 2022 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 27 डावात 41 विकेट्स पटकावल्या आहेत. त्याने टीम इंडियासाठी 18 वनडे सामन्यांत 29, 8 टी20 सामन्यांत 11 तर 15 कसोटीत 46 विकेट्स पटकावल्या आहेत.