एक मोठी खेळी अन् Virat Kohli ठरणार 'असा' पराक्रम करणारा जगातील तिसरा फलंदाज!

याआधी केवळ सचिन तेंडुलकर आणि कुमार संगाकारा यांनीच केलाय असा पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 05:21 PM2024-07-21T17:21:51+5:302024-07-21T17:23:48+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL Virat Kohli near to complete 14000 ODI runs only Sachin Tendulkar Kumar Sangakkara | एक मोठी खेळी अन् Virat Kohli ठरणार 'असा' पराक्रम करणारा जगातील तिसरा फलंदाज!

एक मोठी खेळी अन् Virat Kohli ठरणार 'असा' पराक्रम करणारा जगातील तिसरा फलंदाज!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli, Team India vs Sri Lanka: टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर विराटने टी२० मधून निवृत्ती स्वीकारली. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्यानंतर श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेतून विराट पुन्हा मैदानात उतरणार आहे. २ ऑगस्टपासून भारतीय संघ श्रीलंका विरूद्ध वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत विराटला आपल्या नावावर एक विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे.

विराटला करणार का मोठा विक्रम?

विराट कोहली २ ऑगस्टला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीसाठी उतरेल, तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्याबद्दलच्या महान कामगिरीकडे असतील. वनडे क्रिकेटमधील १४ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी विराटला १५२ धावांची गरज आहे. वनडे क्रिकेट फॉरमॅटमध्ये कोहलीने २९२ सामने आणि २८० डावांमध्ये १३,८४८ धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जर विराटने १५२ धावा केल्या.

असा पराक्रम करणारा विराट जगातील तिसरा

जगात असे दोनच फलंदाज आहेत, ज्यांनी वनडे फॉरमॅटमध्ये १४ हजार किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. ते दोन खेळाडू म्हणजे भारताचा सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या नावावर १८,४२६ धावा आहेत. त्याचवेळी, श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने वनडेमध्ये १४,२३४ धावा केल्या आहेत. या यादीत विराट तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनू शकतो.

Web Title: IND vs SL Virat Kohli near to complete 14000 ODI runs only Sachin Tendulkar Kumar Sangakkara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.