India vs Sri Lanka, 2nd T20I : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला अन् कृणाल पांड्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कृणालच्या संपर्कात आलेले ८ खेळाडू विलगिकरणात असल्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात चार खेळाडूंना पदार्पणाची कॅप द्यावी लागली. या दौऱ्यावर नेट बॉलर म्हणून नेलेल्या गोलंदाजांचाही मुख्य संघात समावेश करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला. तरीही या नव्या दमाच्या संघानं श्रीलंकेला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. १३३ धावांचे माफक लक्ष्य पार करण्यासाठी श्रीलंकेला अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला. श्रीलंकेनं हा सामना ४ विकेट्स राखून जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात मालिकेचा निकाल लागणार आहे.
अम्पायरच्या चुकीमुळे हरला भारत, राखीव खेळाडूंनी श्रीलंकेला रडवलेच होते!
या सामन्याच्या १८व्या षटकात पावसानं काही मिनिटांसाठी हजेरी लावली होती. तेव्हा टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यानं १२व्या खेळाडूच्या हातात एक चिठ्ठी दिली अन् ती कर्णधार शिखर धवनला देण्यास सांगितले. सामन्यानंतर द्रविडनं पाठवलेल्या त्या चिठ्ठीची चर्चा होत आहे. सामन्याच्या १८व्या षटकात श्रीलंकेच्या ६ बाद ११३ धावा असताना काही मिनिटांसाठी पाऊस पडला, परंतु खेळ पुन्हा सुरू झाला. द्रविडनं खेळ थांबला तेव्हा १२वा खेळाडू संदीप वॉरियर याच्या हातात एक चिठ्ठी दिली. द्रविडनं या चिठ्ठीत डकवर्थ-लुईसचं गणित मांडलेलं होतं, असा अंदाज बांधला जात आहे. पण खेळ सुरू झाल्यामुळे त्याची गरज पडली नाही.
Mirabai Chanu : जग जिंकलं, तरी पाय जमिनीवर; मीराबाई चानूच्या साधेपणानं जिंकली मनं!
दुसऱ्या सामन्याचे हायलाईट्स..शिखर धवननं एकाकी झुंज दिल्यामुळे टीम इंडियानं दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेसमोर १३३ धावांचे लक्ष्य ठेवले. शिखरनं ४० धावांची खेळी केली, त्याला देवदत्त पडिक्कल ( २९) व ऋतुराज गायकवाड ( २१) या पदार्पणवीरांची साथ मिळाली. श्रीलंकेकडून मिनोद भानूकाला ( ३६), धनंजया डी सिल्व्हा ( ३९*) व चमिका करुणारत्ने ( १२*) यांनी विजय खेचून आणला. श्रीलंकेनं हा सामना ४ विकेट्सनं जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. कुलदीप यादव, राहुल चहर आणि वरुण चक्रवर्थी यांनी श्रीलंकेला दडपणाखाली ठेवले होते.
राहुल द्रविडनं पाठवला 'सिक्रेट मॅसेज' अन् टीम इंडियाचा विजय; दीपक चहरनं उलगडले रहस्य!