IND vs WACA Practice Match : लोकेश, सूर्यकुमार, अर्शदीप यांची प्रभावी कामगिरी; पाहा सराव सामन्यातील भारतीयांचा रिपोर्ट कार्ड 

IND vs WACA Practice Match : भारतीय संघाला दुसऱ्या सराव सामन्यात पराभव पत्करावा लागला. विराट कोहली दोन्ही सामन्यांत फलंदाजीला न आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 03:41 PM2022-10-13T15:41:14+5:302022-10-13T15:41:45+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WACA Practice Match: Impressive performance by KL Rahul, Suryakumar Yadav & Arshdeep Singh; Check out the report card of the Indians in the practice match | IND vs WACA Practice Match : लोकेश, सूर्यकुमार, अर्शदीप यांची प्रभावी कामगिरी; पाहा सराव सामन्यातील भारतीयांचा रिपोर्ट कार्ड 

IND vs WACA Practice Match : लोकेश, सूर्यकुमार, अर्शदीप यांची प्रभावी कामगिरी; पाहा सराव सामन्यातील भारतीयांचा रिपोर्ट कार्ड 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs WACA Practice Match : भारतीय संघाला दुसऱ्या सराव सामन्यात पराभव पत्करावा लागला. विराट कोहली दोन्ही सामन्यांत फलंदाजीला न आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रोहित शर्मा दुसऱ्या सराव सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये होता, परंतु फलंदाजीलाच आला नाही. त्याच्या जागी आज वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने फिल्डिंग केली.   ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यांपूर्वी भारतीय संघाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामने खेळले आणि त्यात १-१ असा निकाल बरोबरीत राहिला.

पहिल्या सराव सामन्यात रोहित शर्मा - ३ ( ४), रिषभ पंत - ९ ( १६), दीपक हुडा - २२ ( १४) , सूर्यकुमार यादव - ५२ ( ३५), हार्दिक पांड्या - २९ ( २०), दिनेश कार्तिक - १९* ( २३) , अक्षर पटेल - १० ( ५), हर्षल पटेल - ५ ( ४); भुवनेश्वर कुमार - ४-०-२६-२, अर्शदीप सिंग - ३-१-६-३, हर्षल पटेल - ४-०-४९-१, अक्षर पटेल - ३-०-२३-०, दीपक हुडा - २-०-२४-०, युजवेंद्र चहल - ४-०-१५-२ अशी भारतीय खेळाडूंची कामगिरी राहिली.  

आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या ८ बाद १६८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताला ८ बाद १३२ धावा करता आल्या. लोकेश राहुलने ५५ चेंडूंत ७४ धावा केल्या. ( Performance of Indian batters & bowlers in the Warm-up match against Western Australia), रिषभ पंत ९ ( ११),  दीपक हुडा ६ ( ९),  हार्दिक पांड्या १७ ( ९), अक्षर पटेल २ ( ७), दिनेश कार्तिक १० ( १४), हर्षल पटेल २ (१०), आर अश्विन २* ( ४), भुवनेश्वर कुमार ० ( १) अशी फलंदाजांची कामगिरी राहिली.

गोलंदाजीत अर्शदीपने प्रभावी कामगिरी केली. त्याने ३-०-२५-१ अशी कामगिरी केली. भुवनेश्वर कुमारने २ षटकांत १५ धावा, हार्दिकने २ षटकांत १७ धावा, हुडाने २ षटकांत २२ धावा आणि अक्षरने ३ षटकांत २२ धावा दिल्या. आर अश्विनने ४ षटकांत ३२ धावांत ३ विकेट्स व हर्षलने ४ षटकांत २७ धावांत २ विकेट्स घेतल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs WACA Practice Match: Impressive performance by KL Rahul, Suryakumar Yadav & Arshdeep Singh; Check out the report card of the Indians in the practice match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.