IND vs WACA Practice Match : KL Rahul एकटा लढला, संघ संकटात असूनही रोहित शर्मा फलंदाजीला नाही आला; भारत हरला 

IND vs WACA Practice Match : भारतीय संघाला दुसऱ्या सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 02:38 PM2022-10-13T14:38:14+5:302022-10-13T14:38:54+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WACA Practice Match : KL Rahul falls for 74 off 55, Rohit Sharma has not batted, Western Australia defeat India by 36 runs  | IND vs WACA Practice Match : KL Rahul एकटा लढला, संघ संकटात असूनही रोहित शर्मा फलंदाजीला नाही आला; भारत हरला 

KL Rahul 74 (55)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs WACA Practice Match : भारतीय संघाला दुसऱ्या सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. विजयासाठी १६९ धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुलने सर्वाधिक ७४ धावा केल्या आणि त्यानंतर भारताकडून हार्दिक पांड्याने ( १७) सर्वाधिक धावा केल्या. रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव होते, परंतु तो फलंदाजीला आलाच नाही. रिषभ पंत, दीपक हुडा यांना संधीचं सोनं करता आलं नाही आणि भारताने ३६ धावांनी सामना गमावला. 

सौरव गांगुलीची 'विकेट' कोणी घेतली? MS Dhoniशी जवळचे संबंध असलेली व्यक्ती खरी सूत्रधार?

डी शॉर्ट व एल हॉब्सन यांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावून भारताला कडवी टक्कर दिली.  शॉर्ट व हॉब्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. हर्षल पटेलने ही जोडी तोडली. हॉब्सन ४१ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ६४ धावांवर माघारी परतला. त्याच षटकार पटेलने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा दुसरा सेट फलंदाज शॉर्टला रन आऊट केले. शॉर्टने ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. तरीही यजमानांचा धावांचा वेग सुसाट होता.

आर अश्विनने १७ व्या षटकात सामना फिरवला. त्याने सलग दोन चेंडूंत अॅश्टन टर्नर  व सॅम फॅनिंग यांना माघारी पाठवले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर कॅमेरून बँक्रॉफ्टची विकेट घेत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची अवस्था ६ बाद १३७ अशी केली. अश्विनने ४ षटकांत ३२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. अर्शदीपने ३ षटकांत २५ धावांत १,  तर हर्षल पटेलने ४ षटकांत २७ धावांत २ विकेट्स घेतल्या. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने ८ बाद १६८ धावा केल्या.
रोहितचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव असूनही लोकेश राहुलरिषभ पंत ही जोडी सलामीला आली. पण, रिषभला सलग दुसऱ्या सामन्यात अपयश आले आणि त्याने या दोन सराव सामन्यांत ९ व ९ अशा धावा केल्या. दीपक हुडा ९ चेंडूंत ६ धावांवर, तर हार्दिक पांड्या ९ चेंडूंत १७ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था १० षटकांत ३ बाद ६० अशी झाली.   


अक्षर पटेल आला अन् २ धावा करून माघारी परतला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारताचे फलंदाज अपयशी ठरताना दिसले. लोकेश राहुल विकेट टिकवून होता, परंतु त्याच्या स्ट्राईक रेट संथ होता. भारताला अखेरच्या ५ षटकांत ६६ धावा हव्या होत्या अन् त्या अशक्यही नव्हत्या. दिनेश कार्तिक व लोकेश हे फलंदाज मैदानावर होते. पण, कार्तिकने १० धावांवर विकेट टाकली. १९व्या षटकात लोकेश ५५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ७४ धावांवर बाद झाला. रोहितचे नाव प्लेइंग इलेव्हनमध्ये असूनही तो मैदानावर उतरला नाही. भारताला ८ बाद १३२ धावा करता आल्या आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने ३६ धावांनी विजय मिळवला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs WACA Practice Match : KL Rahul falls for 74 off 55, Rohit Sharma has not batted, Western Australia defeat India by 36 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.