IND vs WACA Practice Match : W,W,1,W,0,1! R Ashwin च्या चार चेंडूंत ३ विकेट्स, भारतीय गोलंदाजांची दर्जेदार कामगिरी

IND vs WACA Practice Match :  वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी चांगली झालेली पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 12:42 PM2022-10-13T12:42:09+5:302022-10-13T12:45:59+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WACA Practice Match :  R Ashwin gets three wickets in the 17th over, Western Australia - 168/8. Nicholas Hobson - 64 (41) & D'Arcy Short - 52 (38). | IND vs WACA Practice Match : W,W,1,W,0,1! R Ashwin च्या चार चेंडूंत ३ विकेट्स, भारतीय गोलंदाजांची दर्जेदार कामगिरी

IND vs WACA Practice Match : W,W,1,W,0,1! R Ashwin च्या चार चेंडूंत ३ विकेट्स, भारतीय गोलंदाजांची दर्जेदार कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs WACA Practice Match :  वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी चांगली झालेली पाहायला मिळाली. पहिल्या सराव सामन्यात ४९ धावा देणाऱ्या हर्षल पटेलने आज प्रतिस्पर्धींच्या धावांवर वेसण घातले. आर अश्विन ( R Ashwin) स्टार गोलंदाज ठरला. डी शॉर्ट व एन हॉब्सन यांच्या अर्धशतकांमुळे भारतीय संघ बॅकफूटवर गेला होता, परंत अश्विनने एका षटकात ३ विकेट्स घेत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला धक्के दिले.  

Virat Kohli दुखापतग्रस्त? सराव सामन्यात खेळत नसल्याने चर्चा; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

आजच्या सामन्यात रोहित शर्मा व लोकेश राहुल ही जोडी सलामीला येईल. सूर्यकुमार यादवला विश्रांती दिल्याने दीपक हुडा तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. रिषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार असा संघ आहे. आऱ अश्विन पहिल्या सामन्यात खेळला नव्हता, युजवेंद्र चहलच्या जागी आज तो मैदानावर उतरणार आहे. अर्शदीपने पहिल्याच षटकात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जे फिलिप्सला ( ८) बाद केले.

डी शॉर्ट व एल हॉब्सन यांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावून भारताला कडवी टक्कर दिली. या सामन्यात विराटचे नाव प्लेइंग इलेव्हनमध्ये नसले तरी तो मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दिसला. तो पूर्णपणे तंदुरूस्त आहे आणि त्याच्या दुखापतीच्या चर्चा अफवा आहेत. शॉर्ट व हॉब्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. हर्षल पटेलने ही जोडी तोडली. हॉब्सन ४१ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ६४ धावांवर माघारी परतला. त्याच षटकार पटेलने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा दुसरा सेट फलंदाज शॉर्टला रन आऊट केले. शॉर्टने ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. तरीही यजमानांचा धावांचा वेग सुसाट होता.


आर अश्विनने १७ व्या षटकात सामना फिरवला. त्याने सलग दोन चेंडूंत अॅश्टन टर्नर  व सॅम फॅनिंग यांना माघारी पाठवले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर कॅमेरून बँक्रॉफ्टची विकेट घेत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची अवस्था ६ बाद १३७ अशी केली. अश्विनने ४ षटकांत ३२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. अर्शदीपने ३ षटकांत २५ धावांत १,  तर हर्षल पटेलने ४ षटकांत २७ धावांत २ विकेट्स घेतल्या. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने ८ बाद १६८ धावा केल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs WACA Practice Match :  R Ashwin gets three wickets in the 17th over, Western Australia - 168/8. Nicholas Hobson - 64 (41) & D'Arcy Short - 52 (38).

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.