IND vs WACA Practice Match : ट्वेंटी-२० स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि दीपक चहर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. मोहम्मद शमी फिटनेस टेस्ट पास करून ब्रिस्बनला पोहोचला आहे आणि आता तरी सर्वकाही सुरळीत आहे, असेच दिसतेय. पण, आता एका नव्या चर्चेचा सुरूवात झाली आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही विराट कोहली ( Virat Kohli) खेळला नसल्याने त्याच्या दुखापतीची चर्चा सुरूय आणि त्या बाबतचे महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.
आजच्या सामन्यात रोहित शर्मा व लोकेश राहुल ही जोडी सलामीला येईल. सूर्यकुमार यादवला विश्रांती दिल्याने दीपक हुडा तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. रिषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार असा संघ आहे. आऱ अश्विन पहिल्या सामन्यात खेळला नव्हता, युजवेंद्र चहलच्या जागी आज तो मैदानावर उतरणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"