IND vs WACA Practice Match : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाने पर्थ येथे तळ ठोकला... भारतीय खेळाडूंसाठी येथे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले. भारताने पहिल्या सराव सामन्यात विजय मिळवला, परंतु गोलंदाजांची कामगिरी हा पुन्हा चिंतेचा विषय ठरला. अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार यांनी चांगली कामगिरी केली, परंतु हर्षल पटेलच्या ४ षटकात ४९ धावा आल्या. पहिल्या सामन्यांत विराट कोहली व लोकेश राहुल हे खेळले नव्हते. पण, आज ही दोघं खेळतील अशी अपेक्षा होती, परंतु विराटचा आरामकाळ अद्याप संपलेला नाही. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करणार आहे.
पहिल्या सराव सामन्यातील भारतीयांची कामगिरी - रोहित शर्मा - ३ ( ४), रिषभ पंत - ९ ( १६), दीपक हुडा - २२ ( १४) , सूर्यकुमार यादव - ५२ ( ३५), हार्दिक पांड्या - २९ ( २०), दिनेश कार्तिक - १९* ( २३) , अक्षर पटेल - १० ( ५), हर्षल पटेल - ५ ( ४); भुवनेश्वर कुमार - ४-०-२६-२, अर्शदीप सिंग - ३-१-६-३, हर्षल पटेल - ४-०-४९-१, अक्षर पटेल - ३-०-२३-०, दीपक हुडा - २-०-२४-०, युजवेंद्र चहल - ४-०-१५-२. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाबाबत बोलायचे झाल्यास डार्सी शॉर्ट, कॅमरून बॅनक्रॉफ्ट, एश्टन टर्नर, झाय रिचर्डसन आणि एंड्य्रू टाय यांचा संघात समावेश आहे. या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि काही आयपीएलमध्येही खेळले आहेत.
आजच्या सामन्यात रोहित शर्मा व लोकेश राहुल ही जोडी सलामीला येईल. सूर्यकुमार यादवला विश्रांती दिल्याने दीपक हुडा तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. रिषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार असा संघ आहे ( India X1: Rohit, Rahul (C), Hooda, Pant, Hardik, Karthik, Axar, Harshal, Ashwin, Bhuvi, Arshdeep). आऱ अश्विन पहिल्या सामन्यात खेळला नव्हता, युजवेंद्र चहलच्या जागी आज तो मैदानावर उतरणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"