Join us  

Ind Vs WI : वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल, शनिवारपासून सराव सामना

Ind vs West Indies: भारताविरुद्ध दोन कसोटी, पाच वन डे आणि 3 ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ गुरुवारी राजकोट येथे दाखल झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 3:58 PM

Open in App

राजकोट : भारताविरुद्ध दोन कसोटी, पाच वन डे आणि 3 ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ गुरुवारी राजकोट येथे दाखल झाला. पारंपरिक पद्धतीने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे स्वागत करण्यात आले.  जेसन होल्डरच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट इंडिजचा संघ यजमान भारताचा सामना करणार आहे. नुकतीच झालेली श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका वेस्ट इंडिजने 1-1 अशा बरोबरीत सोडवली होती. भारतीय संघाचा सामना करण्यापूर्वी वेस्ट इंडिजचा संघ बोर्ड एकादश संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेला 4 ऑक्टोबरपासून कसोटी सामन्याने सुरुवात होणार आहे. हा सामना राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे.  वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात 1948 ते आत्तापर्यंत 94 कसोटी सामने झाले. वेस्ट इंडिजने त्यात 30 विजय मिळवले, तर 46 सामने अनिर्णीत राखले. 28 सामन्यांत भारताने बाजी मारली.  वेस्ट इंडिज संघजेसन होल्डर ( कर्णधार), सुनील अॅब्रीस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेस, शेन डोवरीच, शॅनोन गॅब्रीयल, जॅह्मर हॅमिल्टन, शिम्रोन हेटमेर, शाय होप, अल्झारी जोसेफ, किमो पॉल, कायरेन पॉवेल, केमार रोच, जोमेल वॅरिकॅन.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज