IND vs WA Warm up Match : भारत विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ( India vs Western Australia) यांच्यातल्या सराव सामन्यात रोहित शर्मा अँड कंपनीने विजय मिळवला. विराट कोहली व लोकेश राहुल यांना आजच्या सामन्यात विश्रांती दिली गेली. सूर्यकुमार यादव ( ५२) व हार्दिक पांड्या ( २९) यांच्या खेळीच्या जोरावर भारताने सन्मानजनक धावा केल्या, परंतु वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने कडवी टक्कर दिली. २१ वर्षीय फलंदाजाने भारतीय गोलंदाजांना हैराण केले.
रोहित शर्मा व रिषभ पंत ही जोडी सलामीला आली आणि पॉवर प्लेपर्यंत तंबूत पुन्हा परतलीही. बेहरेनडॉर्फने त्याच्या पहिल्याच षटकात रोहितला ३ धावांवर यष्टींमागे झेलबाद करून बाद केले. त्यानंतर दीपक हुडाला बढती दिली आणि त्याने १४ चेंडूंत २२ धावांची खेळी केली. बेहरेनडॉर्फने त्याचीही विकेट घेतली. रिषभ अँड्य्रू टायच्या गोलंदाजीवर चाचपडताना दिसला अन् सहाव्या षटकात ९ धावांवर माघारी परतला. भारताच्या ३ बाद ४५ धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या यांनी भारताच्या डावाला आकार दिला. १२व्या षटकात हार्दिक २९ धावा करून माघारी परतला. सूर्याने फॉर्म कायम राखताना सराव सामन्यातही ५२ धावा केल्या. त्याच्या खेळीत ३ षटकारांचा समावेश होता. अक्षर पटेलने खणखणीत षटकार खेचला, परंतु मॅट केलीच्या यॉर्कवर बाद झाला. भारताच्या १९ षटकांत ६ बाद १४१ धावा झाल्या होत्या. भारताला ६ बाद १५८ धावांपर्यंत मजल मारता आली.
भुवनेश्वर कुमार व अर्शदीप सिंग यांनी पहिल्या चार षटकांत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला १२ धावांत ४ विकेट्स घेतल्या. या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली. २१ वर्षीय सॅम फॅनिंगने भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. ४३ धावांवर असताना हार्दिक पांड्याने त्याचा अफलातून झेल घेतला होता, परंतु हर्षल पटेलचा तो चेंडू NO Ball ठरला. सॅमची ५९ धावांची खेळी अर्शदीपने संपुष्टात आणली आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या १७ षटकांत ५ बाद ११७ धावा झाल्या होत्या. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला ८ बाद १४५ धावा करता आल्या, भारताने अवघ्या १३ धावांनी हा सामना जिंकला.
भारतीय खेळाडूंचे स्कोअर कार्ड ( Score-card of Indian players in the Warm-up match)
- रोहित शर्मा - ३ ( ४)
- रिषभ पंत - ९ ( १६)
- दीपक हुडा - २२ ( १४)
- सूर्यकुमार यादव - ५२ ( ३५)
- हार्दिक पांड्या - २९ ( २०)
- दिनेश कार्तिक - १९* ( २३)
- अक्षर पटेल - १० ( ५)
- हर्षल पटेल - ५ ( ४)
- भुवनेश्वर कुमार - ४-०-२६-२
- अर्शदीप सिंग - ३-१-६-३
- हर्षल पटेल - ४-०-४९-१
- अक्षर पटेल - ३-०-२३-०
- दीपक हुडा - २-०-२४-०
- युजवेंद्र चहल - ४-०-१५-२
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"