Join us  

IND vs WI, 1st ODI Live Updates : रोहित शर्मा वन डे संघाचा कर्णधार होताच एक गोष्टही बदलली, २३ षटकांत विंडीजची वाट लावली

India vs West Indies, 1st ODI Live Updates : भारताच्या वन डे संघाच्या कर्णधारपदी BCCIने नाव जाहीर केल्यानंतर रोहित शर्माच्या फुल टाईम नेतृत्वाखाली पहिलाच वन डे सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने कमाल केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 3:23 PM

Open in App

India vs West Indies, 1st ODI Live Updates : भारताच्या वन डे संघाच्या कर्णधारपदी BCCIने नाव जाहीर केल्यानंतर रोहित शर्माच्या फुल टाईम नेतृत्वाखाली पहिलाच वन डे सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने कमाल केली. वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या पहिल्या षटकातील ५ चेंडूंत दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर युझवेंद्र चहलचा ( Yuzvendra Chahal ) बोलबाला राहिला. युझीने सलग दोन चेंडूवर विकेट घेतल्या आणि पुढच्याच षटकात आणखी एक विकेट घेत भर टाकली. २३ षटकांत विंडिजचे ७ फलंदाज ७९ धावांवर माघारी पाठवून भारतीय संघाने वर्चस्व गाजवले होते. पण, या २३ षटकांत असे काही घडले, जे पाहताना चाहत्याना विश्वास बसत नव्हता. 

रोहित शर्माकडे पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी आल्यानंतरच्या पहिल्याच वन डे सामन्यात भारतीय संघाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला वन डे सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि रोहितने एका तगड्या फलंदाजाला पदार्पणाची संधी दिली. भारताचा हा १००० वा वन डे सामना आहे आणि जगात १००० वन डे सामने खेळणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. आजच्या सामन्यात स्थानिक स्पर्धा गाजवणाऱ्या दीपक हुडाला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

 

मोहम्मद सिराजने तिसऱ्याच षटकात वेस्ट इंडिजला धक्का दिला. सलग दोन चौकार मारणाऱ्या शे होपला ( ८) तिसऱ्या चेंडूवर सिराजने त्रिफळाचीत केले. ब्रँडन किंग व डॅरेन ब्राव्हो यांनी विंडिजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. किंग ( १३ ) व ब्राव्हो ( १८) यांना वॉशिंग्टनने माघारी पाठवले. त्यानंतर निकोलस पूरनला ( १८) धावांवर माघारी पाठवून युझवेंद्र चहलने मोठा पराक्रम केला. वन डे क्रिकेटमध्ये त्याने १०० विकेट्स पूर्ण केल्या. भारताकडून सर्वात कमी डावांत विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चहलने ( ६० डाव) झहीर खानला ( ६५ डाव)  मागे टाकले.  चहलने सलग दुसऱ्या चेंडूवर किरॉन पोलार्डची ( ० ) विकेट घेतली, पण तो हॅटट्रिक घेण्यापासून चुकला. विंडिजचा निम्मा संघ ७१ धावांवर तंबूत परतला. 

त्यानंतर विंडीजने आणखी दोन विकेट्स गमावल्या. २३ षटकांत त्यांची अवस्था ७ बाद ७९ अशी झाली होती. या पैकी तीन विकेट्स या आधी मैदानावरील अम्पायरने नाकारल्या होत्या. पण, रोहित शर्माने DRS घेत अम्पायरला त्यांचा निर्णय बदलण्यास भाग पाडले. आश्चर्याची बाब म्हणजे DRS ची पंगा असलेल्या विराट कोहलीने एका DRS साठी रोहितला मनवले आणि तोही यशस्वी ठरला. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मावॉशिंग्टन सुंदरयुजवेंद्र चहल
Open in App