India vs West Indies, 1st ODI Live Updates : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा पहिल्या वन डे सामन्यातील DRS घेण्याचा अंदाज यशस्वी ठरला. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला वन डे सामना सुरू आहे आणि या सामन्यात भारताचा वन डे संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने घेतलेले DRS चे सर्व निर्णय यशस्वी ठरले.
सामन्याच्या २२व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर शामराह ब्रूक्स याच्यासाठी कॅचची अपील झाली. चहलने टाकलेला चेंडू ब्रूक्सच्या बॅटीला किनार घेत यष्टिरक्षक रिषभ पंत याच्या हाती झेपावला. मैदानावरील अम्पायरने नाबाद निर्णय देताच भारतीय गोलंदाज संभ्रमात पडले. रोहित शर्मा यष्टिरक्षक रिषभ पंतला चेंडू बॅटला नक्की लागला का असे विचारत होता. चहलला ठाम विश्वास होता आणि तितक्यात कोहली आला आणि त्यानं रोहितला DRS घेण्यास सांगितले.
''रोहित, चेंडू बॅटलला लागला आहे आणि बॅट पॅडवर आदळली आहे. १०० टक्के मी आवाज ऐकला आहे. मला वाटतंय तो आऊट आहे,''असे विराट रोहितला म्हणाला. रोहितने घेतलेला हा निर्णय यशस्वी ठरला.
दरम्यान, ७ बाद ७९ अशा अवस्थेत सापडलेल्या विंडीजसाठी जेसन होल्डर व फॅबियन अॅलन ही जोडी धावून आली. या दोघांनी ८व्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. जेसन होल्डरने वन डेतील ११ वे अर्धशतक पूर्ण करताना २००० धावाही पूर्ण केल्या. वॉशिंग्टन सुंदरने ही भागीदारी तोडताना फॅबियनला २९ धावांवर बाद केले.
Web Title: IND vs WI, 1st ODI Live Updates : How Virat Kohli convinced captain Rohit Sharma to take DRS in 1st ODI vs WI; 'The ball has touched the bat', Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.