India vs West Indies 1st ODI Live Updates : शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजवर अवघ्या ३ धावांनी विजय मिळवला. भारताच्या ७ बाद ३०८ धावांचा पाठलाग करताना विंडीजने ६ बाद ३०५ धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) अखेरच्या षटकात बाजी पलटवली अन् रोमारिओ शेफर्डची ( Romario Shepherd) झुंज अपयशी ठरली. त्या ५०व्या षटकाने सर्व क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती.
शिखर धवन ( ९७ ), शुबमन गिल ( ६४) आणि श्रेयस अय्यर ( ५४) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर भारत ४००च्या आसपास धावा करेल असे चित्र दिसत होते, परंतु अखेरच्या १५ षटकांत विंडीज गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. दीपक हुडा ( २७) व अक्षर पटेल ( २१) यांनी संघाला ७ बाद ३०८ धावांपर्यंत पोहोचवले. ३५ षटकांत २ बाद २२५ अशा धावा भारताने केल्या होत्या, परंतु पुढील १५ षटकांत ८३ धावांत ५ फलंदाज गमावले. प्रत्युत्तरात कायले मेयर्स ( Kyle Mayers ) व शामर्ह ब्रूक्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूरने ब्रुक्सला ( ४६) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. शार्दूलने पुढच्याच षटकात सेट फलंदाज मेयर्सलाही ( ७५) माघारी पाठवले. कर्णधार निकोलस पूरन व ब्रेंडन किंग्स यांनी ५१ व अकिल होसैन व किंग यांनी ५६ धावांची भागीदारी करताना सामना जीवंत ठेवला. होसैन व शेफर्ड यांनी ३३ चेंडूंत ५३ धावा जोडल्या, परंतु ३ धावांनी त्यांची हार झाली.
अखेरच्या षटकाचा थरार...
६ चेंडू १५ धावा हव्या असताना पहिला चेंडू सिराजने निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या शेफर्डने चौकार खेचला. २ धाव घेत विंडीजने ३०० धावांचा टप्पा ओलांडला. सिराजने Wide टाकला. नंतर २ धाव घेत १ चेंडू ५ धावा असा सामना आणला. पण, सिराजने अखेरच्या चेंडूवर १ धाव देत भारताला ३ धावांनी विजय मिळवून दिला. रोमारिओ शेफर्ड ३७ व होसैन ३२ धावांवर नाबाद राहिले. विंडीजने ६ बाद ३०५ धावा केल्या.
Web Title: IND vs WI 1st ODI Live Updates : India defeat West Indies by 3 runs, Mohammed Siraj the hero for India as he holds his nerve against a rampaging Romario Shepherd, Watch final over Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.