Join us  

Mohammed Siraj, IND vs WI 1st ODI Live Updates : मोहम्मद सिराज भारताच्या विजयाचा नायक ठरला, पाहा अखेरच्या षटकात कसा सामना खेचून आणला, Video  

Mohammed Siraj, IND vs WI 1st ODI Live Updates : कर्णधार निकोलस पूरन व ब्रेंडन किंग्स यांनी ५१ व अकिल होसैन व किंग यांनी ५६ धावांची भागीदारी करताना सामना जीवंत ठेवला. होसैन व शेफर्ड यांनी ३३ चेंडूंत ५३ धावा जोडल्या, परंतु ३ धावांनी त्यांची हार झाली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 8:15 AM

Open in App

India vs West Indies 1st ODI Live Updates : शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजवर अवघ्या ३ धावांनी विजय मिळवला. भारताच्या ७ बाद ३०८ धावांचा पाठलाग करताना विंडीजने ६ बाद ३०५ धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) अखेरच्या षटकात बाजी पलटवली अन् रोमारिओ शेफर्डची ( Romario Shepherd) झुंज अपयशी ठरली. त्या ५०व्या षटकाने सर्व क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती.  शिखर धवन ( ९७ ), शुबमन गिल ( ६४) आणि श्रेयस अय्यर ( ५४) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर भारत ४००च्या आसपास धावा करेल असे चित्र दिसत होते, परंतु अखेरच्या १५ षटकांत विंडीज गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. दीपक हुडा ( २७) व अक्षर पटेल ( २१) यांनी संघाला ७ बाद ३०८ धावांपर्यंत पोहोचवले. ३५ षटकांत २ बाद २२५ अशा धावा भारताने केल्या होत्या, परंतु पुढील १५ षटकांत ८३ धावांत ५ फलंदाज गमावले. प्रत्युत्तरात कायले मेयर्स ( Kyle Mayers ) व शामर्ह ब्रूक्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूरने ब्रुक्सला ( ४६) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. शार्दूलने पुढच्याच षटकात सेट फलंदाज मेयर्सलाही ( ७५)  माघारी पाठवले. कर्णधार निकोलस पूरन व ब्रेंडन किंग्स यांनी ५१ व अकिल होसैन व किंग यांनी ५६ धावांची भागीदारी करताना सामना जीवंत ठेवला. होसैन व शेफर्ड यांनी ३३ चेंडूंत ५३ धावा जोडल्या, परंतु ३ धावांनी त्यांची हार झाली.  अखेरच्या षटकाचा थरार... ६ चेंडू १५ धावा हव्या असताना पहिला चेंडू सिराजने निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या शेफर्डने चौकार खेचला. २ धाव घेत विंडीजने ३०० धावांचा टप्पा ओलांडला. सिराजने  Wide टाकला. नंतर २ धाव घेत १ चेंडू ५ धावा असा सामना आणला. पण, सिराजने अखेरच्या चेंडूवर १ धाव देत भारताला ३ धावांनी विजय मिळवून दिला.  रोमारिओ शेफर्ड ३७ व होसैन ३२ धावांवर नाबाद राहिले. विंडीजने ६ बाद ३०५ धावा केल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमोहम्मद सिराजशिखर धवन
Open in App