IND vs WI, 1st ODI Live Updates : रोहित शर्माच्या नेतृत्वाने कमाल केली, योग्य रणनीती आखताना वेस्ट इंडिजची कोंडी केली 

India vs West Indies, 1st ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात  वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा यांनी दर्जेदार कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 04:48 PM2022-02-06T16:48:47+5:302022-02-06T16:52:13+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI, 1st ODI Live Updates : India need 177 runs to win the first ODI against West Indies - the spin duo did the magic - 4 wickets for Chahal and 3 wickets for Sundar | IND vs WI, 1st ODI Live Updates : रोहित शर्माच्या नेतृत्वाने कमाल केली, योग्य रणनीती आखताना वेस्ट इंडिजची कोंडी केली 

IND vs WI, 1st ODI Live Updates : रोहित शर्माच्या नेतृत्वाने कमाल केली, योग्य रणनीती आखताना वेस्ट इंडिजची कोंडी केली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies, 1st ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात  वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा यांनी दर्जेदार कामगिरी केली. वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डर ( Jason Holder) आणि फॅबियन अॅलेन यांनी संघर्ष करताना भारतासमोर समाधानकारक लक्ष्य उभे करण्यात यश मिळवले. चहलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर सुंदर व कृष्णा यांनी अनुक्रमे ३ व २ विकेट्स घेतल्या. 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने तिसऱ्याच षटकातवेस्ट इंडिजला धक्का दिला. सलग दोन चौकार मारणाऱ्या शे होपला ( ८) तिसऱ्या चेंडूवर सिराजने त्रिफळाचीत केले. ब्रँडन किंग व डॅरेन ब्राव्हो यांनी विंडिजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. किंग ( १३ ) व ब्राव्हो ( १८) यांना वॉशिंग्टनने माघारी पाठवले. त्यानंतर निकोलस पूरनला ( १८) धावांवर माघारी पाठवून युझवेंद्र चहलने मोठा पराक्रम केला.

वन डे क्रिकेटमध्ये त्याने १०० विकेट्स पूर्ण केल्या. भारताकडून सर्वात कमी डावांत विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चहलने ( ६० डाव) झहीर खानला ( ६५ डाव)  मागे टाकले.  चहलने सलग दुसऱ्या चेंडूवर किरॉन पोलार्डची ( ० ) विकेट घेतली, पण तो हॅटट्रिक घेण्यापासून चुकला. विंडिजचा निम्मा संघ ७१ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर विंडीजने आणखी दोन विकेट्स गमावल्या. २३ षटकांत त्यांची अवस्था ७ बाद ७९ अशी झाली होती.  

७ बाद ७९ अशा अवस्थेत सापडलेल्या विंडीजसाठी जेसन होल्डर व फॅबियन अॅलन ही जोडी धावून आली. या दोघांनी ८व्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. जेसन होल्डरने वन डेतील ११ वे अर्धशतक पूर्ण करताना २००० धावाही पूर्ण केल्या. वॉशिंग्टन सुंदरने ही भागीदारी तोडताना फॅबियनला २९ धावांवर बाद केले. होल्डर ७१ चेंडूंत ४ षटकारांसह ५७ धावांवर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला. वेस्ट इंडिजचा संघ ४३.५ षटकांत १७६ धावांवर तंबूत परतला.


 

Web Title: IND vs WI, 1st ODI Live Updates : India need 177 runs to win the first ODI against West Indies - the spin duo did the magic - 4 wickets for Chahal and 3 wickets for Sundar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.