Join us  

Ravindra Jadeja, IND vs WI 1st ODI Live Updates : उप कर्णधार रवींद्र जडेजा आज खेळणार की नाही?; शिखर धवनच्या उत्तराने व्हाल आश्चर्यचकीत 

India vs West Indies 1st ODI Live Updates : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 6:05 PM

Open in App

India vs West Indies 1st ODI Live Updates : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. संघाचा उप कर्णधार रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) आजच्या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे, त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीने डोके वर काढले आहे आणि तो कदाचित वन डे मालिकेतूनच माघार घेणार असल्याची चर्चा आहे. पण, २९ जुलैपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी तो तंदुरुस्त होईल, अशी दिलासादायक बातमीही समोर आली आहे.  

BCCI ने अद्याप याबाबत काहीच अधिकृत जाहीर केलेले नाही. पण, भारताचा कर्णधार शिखर धवन याने काही अपडेट्स दिले आहेत. त्याने जडेजाला दुखापत झालीय, या वृत्ताला दुजोरा दिला, परंतु तो तंदुरुस्त आहे की नाही, याबाबत त्याने काहीच सांगितलेले नाही. तो म्हणाला, त्याला दुखापत झालीय, परंतु पहिल्या वन डेत तो खेळण्यासाठी तयार आहे की नाही  हे मलाही माहीत नाही. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आहेत आणि आमच्याकडे जलदगती गोलंदाजांची चांगली फळी आहे. 

जडेजाची माघार हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. त्याच्याजागी अक्षर पटेलला अंतिम एकादशमध्ये संधी मिळू शकते. जडेजाच्या जागी आता उप कर्णधार म्हणून कोणाची निवड होईल, याची उत्सुकता लागली आहे. सध्याच्या संघात शार्दूल ठाकूर व युजवेंद्र चहल हे दोन सीनियर खेळाडू आहेत.

    

भारताचा वन डे संघ- शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग. 

वन डे मालिका-२२ जुलै - पहिली वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२४ जुलै - दुसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२७ जुलै - तिसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता) 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरवींद्र जडेजाशिखर धवनबीसीसीआय
Open in App