Join us  

इशान किशन की संजू सॅमसन - किपर म्हणून पसंती कोणाला? 'रणजी किंग' जाफर म्हणतो...

वन डे वर्ल्ड कपच्या दृष्टीने सध्या भारत नव्या सर्वोत्तम विकेटकिपरच्या शोधात आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 4:01 PM

Open in App

Ishan Kishan vs Sanju Samson, IND vs WI : रणजी किंग म्हणून ओळख असलेला, माजी सलामीवीर मुंबईकर वसीम जाफर नेहमीच टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल आपले मत मांडत असतो. सध्या भारताचा संघ विंडिज दौऱ्यावर (India vs West Indies) आहे. या दौऱ्यावर आजपासून तीन सामन्यांची वन डे मालिका सुरू होणार आहे. रिषभ पंत याच्या अनुपस्थितीत सध्या भारतासमोर विकेटकिपर कोण, हा प्रश्न आ वासून उभा आहे. केएल राहुलला दुखापतीमुळे अद्याप संघात स्थान मिळालेले नाही. पण सध्याच्या घडीला नव्या दमाचे दोन खेळाडू विकेटकिपर म्हणून स्पर्धेत आहेत. इशान किशन आणि संजू सॅमसन हे दोघेही IPL मध्ये दमदार कामगिरी करून भारतीय संघाचा भाग बनले आहेत. मात्र आता विंडिजविरूद्ध या दौघांपैकी कुणा एकालाच संघात संधी मिळणार आहे. अशा वेळी वसीम जाफरने नक्की कोणाला पसंती दर्शवली आहे आणि त्याच्या मते आजच्या सामन्यासाठी  Team India Playing XI कशी असेल, याबद्दल जाणून घेऊया.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी वसीम जाफरने दमदार खेळाडूंनी युक्त अशी टीम इंडियाची स्वत:ची प्लेइंग इलेव्हन (प्लेइंग 11) निवडली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज संध्याकाळी 7:00 वाजता ब्रिजटाउन (बार्बाडोस) येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. ब्रिजटाऊन (बार्बाडोस) येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर आज होणार्‍या या पहिल्या वनडेसाठी वसीम जाफरने भारताच्या प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे.

इशान किशन की संजू सॅमसन?

आजच्या सामन्यासाठी त्याने रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीला सलामीवीर ठरवले आहे. मधल्या फळीत वसीम जाफरने विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर आणि यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला चौथ्या क्रमांकावर स्थान दिले आहे. त्यामुळे इशान किशनला त्याने संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. हार्दिक पांड्याला पाचव्या तर सूर्यकुमार यादवला त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली आहे. त्याने अष्टपैलू रवींद्र जडेजाला सातव्या क्रमांकावर निवडले आहे. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या दोघांनाही त्याने संघात घेतले आहे. तर मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक या दोन वेगवान गोलंदाजांना त्यांने संधी दिली आहे.

दरम्यान, सिराज वैयक्तिक कारणामुळे पहिल्या वन डे मधून माघार घेऊन मायदेशी परतला असल्याने त्याच्या जागी दुसरा वेगवान गोलंदाज संघात स्थान मिळवू शकतो. परंतु, इशान किशनपेक्षा जाफरने संजू सॅमसनलाच वरचढ मानले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजवासिम जाफरइशान किशनसंजू सॅमसन
Open in App