India vs West Indies, 1st ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा यांनी दर्जेदार कामगिरी केली. वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डर ( Jason Holder) आणि फॅबियन अॅलेन यांनी संघर्ष करताना भारतासमोर समाधानकारक लक्ष्य उभे करण्यात यश मिळवले. चहलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर सुंदर व कृष्णा यांनी अनुक्रमे ३ व २ विकेट्स घेतल्या. आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) घेतलेले तीनही DRS यशस्वी ठरले आणि महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) भारी खूश झाले. त्यांनी आता DRS चे नवे नामांतर केले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदा जी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने तिसऱ्याच षटकात वेस्ट इंडिजला धक्का दिला. सलग दोन चौकार मारणाऱ्या शे होपला ( ८) तिसऱ्या चेंडूवर सिराजने त्रिफळाचीत केले. ब्रँडन किंग व डॅरेन ब्राव्हो यांनी विंडिजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. किंग ( १३ ) व ब्राव्हो ( १८) यांना वॉशिंग्टनने माघारी पाठवले. त्यानंतर निकोलस पूरनला ( १८) धावांवर माघारी पाठवून युझवेंद्र चहलने मोठा पराक्रम केला. चहलने सलग दुसऱ्या चेंडूवर किरॉन पोलार्डची ( ० ) विकेट घेतली, पण तो हॅटट्रिक घेण्यापासून चुकला.
विंडिजचा निम्मा संघ ७१ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर विंडीजने आणखी दोन विकेट्स गमावल्या. ७ बाद ७९ अशा अवस्थेत सापडलेल्या विंडीजसाठी जेसन होल्डर व फॅबियन अॅलन ही जोडी धावून आली. या दोघांनी ८व्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. जेसन होल्डरने वन डेतील ११ वे अर्धशतक पूर्ण करताना २००० धावाही पूर्ण केल्या. वॉशिंग्टन सुंदरने ही भागीदारी तोडताना फॅबियनला २९ धावांवर बाद केले. होल्डर ७१ चेंडूंत ४ षटकारांसह ५७ धावांवर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला. वेस्ट इंडिजचा संघ ४३.५ षटकांत १७६ धावांवर तंबूत परतला.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
या सामन्यात समालोचन करणारे सुनील गावस्कर रोहित शर्माच्या नेतृत्वकौशल्यावर खूश झाले. ते म्हणाले,''रोहित शर्माने DRS चे अचूक निर्णय घेतले. याआधी जेव्हा धोनीचे DRS चे अधिक निर्णय योग्य ठरले होते, तेव्हा आपण त्याला Dhoni Review System असे म्हणायचो, आता त्याचं नामांतर करून 'Definitely Rohit System असे करायला हवे.''
Web Title: IND vs WI, 1st ODI Live Updates : Rohit Sharma got those reviews spot on, Now you can term DRS it as 'Definitely Rohit System: Sunil Gavaskar on commentary
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.