India vs West Indies 1st ODI Live Updates : युवा खेळाडूंना सोबत घेऊन मैदानावर उतरलेल्या शिखर धवनने ( Shikhar Dhawan) भारताला आश्वासक सुरूवात करून दिली. शुबमन गिलने ( Shubman Gill) वन डेतील पहिले अर्धशतक झळकावताना गब्बरसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. शुबमन माघारी परतल्यानंतर धवन व श्रेयस अय्यर यांनी ९७ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी केली. पण, हे सेट फलंदाज वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी दोन अफलातून झेल पकडून माघारी पाठवले आणि भारताची धावगती संथ केली. धवनचे शतक थोडक्यात हुकले अन् तो नकोशा क्लबमध्ये जाऊन बसला.
''इशान किशनची कारकीर्द संपवण्याचा राहुल द्रविडचा प्रयत्न''!, सोशल मीडियावर सुरू झालीय चर्चा, पण का?
शुबमन गिल व शिखर धवन सलामीला येणार आले आणि त्यांनी चौकारांचा पाऊस पाडला. विंडीजच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा भारतीय फलंदाज पुरेपूर फायदा उचलताला. धवन व शुबमन यांची ११९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. विंडीज कर्णधार निकोलस पूरनच्या अचून थ्रो ने गिलला केले धावबाद केले आणि त्याला ६४ धावांवर माघारी जावे लागले. त्याच्या खेळीत ६ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर धवन व उप कर्णधार श्रेयस यांनी आक्रमक खेळ केला. धवन नव्हर्स ९०चा शिकार झाला. शतकाच्या उंबरठ्यावर आल्यानंतर त्याला माघारी परतावे लागले.
चांगला खेळ सुरू असताना कोणाची दृष्ट लागली?; पाहा शुबमन गिलची विकेट कोणाच्या चुकीमुळे पडली, Video
गुदाकेश मोतीएने विंडीजला ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्याच्या फिरकीवर कट मारण्याचा प्रयत्न धवनने केला अन् बॅकवर्ड पॉईंटला उभ्या असलेल्या शामर्ह ब्रूक्सने अफलातून कॅच घेतला. धवन ९९ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ९७ धावांवर माघारी परतला. आज त्याने शतक झळकावले असते तर पुरूषांच्या वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो १००वा कर्णधार ठरला असता. नव्हर्स ९० मध्ये बाद होणारा तो भारताचा सातवा कर्णधार ठरला. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन ( १९९२, १९९३ व १९९८), सचिन तेंडुलकर ( १९९७ व २०००), सौरव गांगुली ( २००४ दोनवेळा), महेंद्रसिंग धोनी ( २००९ दोनवेळा), राहुल द्रविड ( २००६), विराट कोहली ( २०१७) हे शतकाला थोडक्यात हुकले होते. पण, सर्वात कमी धावांत शतक हुकलेला धवन हा पहिलाच कर्णधार आहे, यापूर्वी २००९मध्ये धोनी वेस्ट इंडिजविरुद्धच ९५ धावांवर बाद झाला होता.