Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates :हे काय! फिल्डिंग सोडून शिखर धवन चक्क push ups मारू लागला, Video Viral 

India vs West Indies 1st ODI Live Updates : भारताने जरी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली असली तरी विंडीजच्या खेळाडूंनी आज कमाल केली. काही दिवसांपूर्वी बांगलादेशकडून ३-० असा हार मानणारा हाच तो विंडीजचा संघ ज्याने आज बलाढ्य टीम इंडियाला कडवी टक्कर दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 07:54 AM2022-07-23T07:54:04+5:302022-07-23T07:55:01+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st ODI Live Updates : Shikhar Dhawan, When he's not batting, he's still entertaining, he is doing push ups during fielding, Video  | Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates :हे काय! फिल्डिंग सोडून शिखर धवन चक्क push ups मारू लागला, Video Viral 

Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates :हे काय! फिल्डिंग सोडून शिखर धवन चक्क push ups मारू लागला, Video Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 1st ODI Live Updates : शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजवर अवघ्या ३ धावांनी विजय मिळवला. भारताच्या ७ बाद ३०८ धावांचा पाठलाग करताना विंडीजने ६ बाद ३०५ धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) अखेरच्या षटकात बाजी पलटवली अन् रोमारिओ शेफर्डची ( Romario Shepherd) झुंज अपयशी ठरली. पण, या सामन्यात धवनच्या एका व्हिडीओची चर्चा सुरू झाली आहे. त्यात तो चक्क मैदानावर पुश अप्स मारताना दिसतोय. ९७ धावा करणाऱ्या गब्बरला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. 


 शिखर धवन ( ९७ ), शुबमन गिल ( ६४) आणि श्रेयस अय्यर ( ५४) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर भारत ४००च्या आसपास धावा करेल असे चित्र दिसत होते, परंतु अखेरच्या १५ षटकांत विंडीज गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. दीपक हुडा ( २७) व अक्षर पटेल ( २१) यांनी संघाला ७ बाद ३०८ धावांपर्यंत पोहोचवले. ३५ षटकांत २ बाद २२५ अशा धावा भारताने केल्या होत्या, परंतु पुढील १५ षटकांत ८३ धावांत ५ फलंदाज गमावले.  

वेस्ट इंडिजची सुरुवात काही खास झाली नाही. मोहम्मद सिराजने ५व्या षटकात बाऊन्सरवर शे होपला ( ७) झेल देण्यास भाग पाडले. विंडीजला १६ धावांवर पहिला धक्का बसला. पण, कायले मेयर्स ( Kyle Mayers ) व शामर्ह ब्रूक्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूरने ब्रुक्सला ( ४६) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. शार्दूलने पुढच्याच षटकात सेट फलंदाज मेयर्सलाही ( ७५)  माघारी पाठवले.कर्णधार निकोलस पूरन व ब्रेंडन किंग्स यांनी ५१ व अकिल होसैन व किंग यांनी ५६ धावांची भागीदारी करताना सामना जीवंत ठेवला. होसैन व शेफर्ड यांनी ३३ चेंडूंत ५३ धावा जोडल्या, परंतु ३ धावांनी त्यांची हार झाली. 

मीcrमीदरम्यान, युजवेंद्र चहलच्या षटकात क्षेत्ररक्षण करताना शिखर धवन चक्क सूर्यनमस्कार मारू लागला.. 



 

Web Title: IND vs WI 1st ODI Live Updates : Shikhar Dhawan, When he's not batting, he's still entertaining, he is doing push ups during fielding, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.