Join us  

Shreyas Iyer, IND vs WI 1st ODI Live Updates : शुबमन गिलने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, श्रेयस अय्यरनेही केला मोठा पराक्रम  

शुबमन गिल व शिखर धवन यांची ११९ धावांची भागीदारी १८व्या षटकात संपुष्टात आली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 12:34 AM

Open in App

India vs West Indies 1st ODI Live Updates : शिखर धवन ( Shikhar Dhawan), शुबमन गिल ( Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) या आघाडीच्या फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. यांची फलंदाजी पाहून टीम इंडिया आज ४०० पार धावा सहज उभारेल असेच चित्र दिसत होते. पण, वेस्ट इंडिजचने चांगले कमबॅक केले.  ३५ षटकांत २ बाद २२५ अशा धावा भारताने केल्या होत्या, परंतु पुढील १५ षटकांत ८३ धावांत ५ फलंदाज गमावले. या सामन्यात धवन, श्रेयस व शुबमन या तिघांनी विक्रमी कामगिरी केली.   ( IND vs WI 1st ODI सामन्याचे धावफलक एका क्लिकवर

शुबमन गिल व शिखर धवन यांची ११९ धावांची भागीदारी १८व्या षटकात संपुष्टात आली. विंडीज कर्णधार निकोलस पूरनच्या अचून थ्रो ने गिलला केले धावबाद केले आणि त्याला ६४ धावांवर माघारी जावे लागले. धवन व श्रेयस यांनी ९४ धावा जोडल्या. धवनला शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी परतावे लागले. गुदाकेश मोतीएने विंडीजला ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्याच्या फिरकीवर कट मारण्याचा प्रयत्न धवनने केला अन् बॅकवर्ड पॉईंटला उभ्या असलेल्या शामर्ह ब्रूक्सने अफलातून कॅच घेतला. धवन ९९ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ९७ धावांवर माघारी परतला. 

गुदाकेश मोतीएनेच श्रेयसची विकेट मिळवून दिली. कव्हरवर उभ्या असलेल्या निकोलस पूरनने हवेत झेपावत एका हाताने चेंडू टिपला. श्रेयस ५७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव ( १३), संजू सॅमसन ( १२) झटपट माघारी परतले आणि भारताच्या धावगतीचा वेग झपाट्याने संथ होत गेला. अल्झारी जोसेफने ४९व्या षटकात अक्षर ( २१) व दीपक ( २७)  या दोघांचाही त्रिफळा उडवला. भारताला ७ बाद ३०८ धावा करता आल्या.

या सामन्यात श्रेयसने वन डे क्रिकेटमध्ये जलद १०००+ धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. विराट कोहली व शिखर धवन यांनी २४ डावांत हा पराक्रम केला होता. नवज्योत सिंग व श्रेयस यांनी २५ डावांत, तर लोकेश राहुलने २७ डावांत वन डे क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडला.

वेस्ट इंडिजमध्ये वन डेत अर्धशतक झळकावणारा शुबमन हा विराट कोहलीनंतर ( २२ वर्ष व २१५ दिवस) दुसरा युवा फलंदाज ठरला. शुबमनचे वय २२ वर्ष व ३१७ दिवस आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा ( २४ वर्ष व ३ दिवस) विक्रम मोडला. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशुभमन गिलश्रेयस अय्यरसचिन तेंडुलकर
Open in App